Khandesh Darpan 24x7

भव्य कृषी प्रदर्शन ( 'कृषिधन' ) निमित्त मिलेट मॅरेथॉन (भरड धान्य दौड) स्पर्धा



प्रतिनिधी :    राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी  


फैजपूर- रावेर-यावल परिसराचे लोकप्रिय आमदार शिरिष मधुकरराव चौधरी यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली 'कृषिधन' कृषिप्रदर्शन हे सातपुडा विकास मंडळ, पाल संचलित कृषी विज्ञान केंद्र, पाल ता.रावेर जि. जळगांव यांच्या मार्फत दिनांक ०४ ते ०६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आयोजित  करण्यात येत आहे. 



कृषिप्रदर्शना निमित्त एक धाव शेतकऱ्यांसाठी या उपक्रमा अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. 


सदरील स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकास अनुक्रमे प्रथम बक्षीस रु. 1111/-व्दितीय बक्षीस रु. 751/- , तृतीय बक्षीस रु. 551/- व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. 


स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे नोंदणी शुल्क नाही. 

पुढे दिलेल्या लिंक वर जाऊन नोंदणी करावी.


स्पर्धेत सहभागी होणेसाठी येथे क्लिक करा


असे आवाहन संस्थेचे सचिव अजित पाटील यांनी केले. 


मॅरेथॉन स्पर्धा दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी पुरूषांसाठी 5 किलोमीटर  आणि महिलांसाठी 3 किलोमीटर अंतराची असणार आहे. 


स्पर्धा दुपारी 2:15 वाजता सुरूवात होणार आहे. परिसरातील जास्तीत नागरिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा. 


स्पर्धेत नाव नोंदविण्यासाठी डाॅ. गोविंद मारतळे, शारीरिक शिक्षण संचालक, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांच्याशी 9637105757 या क्रमांकावर संपर्क साधावा.


स्पर्धेचे ठिकाण :- लोकसेवक मधुकर राव चौधरी फार्मसी कॉलेज शेजारील मैदान,फैजपूर ता. यावल, जि. जळगांव. 





अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم