खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
अग्निवीर भरती प्रक्रियेमध्ये आता पर्यंतचा सर्वात मोठा बदल करण्यात आलेला आहे. काही दिवसापूर्वी ४० हजार अग्निवीरांची भरती झाली होती. त्याच्यामधील १० हजार अग्निवीरांची पदे ही स्थायी भरतीने करण्यात येणार आहेत. कोणत्या ना कोणत्या प्रक्रियेमुळे अग्निपथ भरती प्रक्रिया नेहमी चर्चेत असते. या भरती प्रक्रियेमध्ये आता वेगळा बदल करण्यात आला आहे. आता इच्छुक उमेदवारांची सर्वप्रथम लेखी परीक्षा ही घेतली जाणार आहे. आणि त्याच्या नंतरच त्यांची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे. जर विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये पास झाला तरच तो पुढे शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी देऊ शकणार आहे. आणि जर तो वैद्यकीय चाचणीमध्ये नापास झाला तर पुढील प्रक्रिया त्याला करता येणार नाही.
आता पर्यंतच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिले शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी घेतली जात होती, आणि त्याच्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेण्यात यायची. पण आता ही प्रक्रिया बदलण्यात येणारा असून लवकरच नव्या प्रक्रियाने अग्नीवीर भरती होणार आहे. गेल्या वर्षी लष्करात अग्निवीरांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आणि त्यात 40,000 हून अधिक अग्निवीरांची भरती ही झाली होती.
नौदलात सुद्धा बदल -
या भरती प्रक्रिया मध्ये सुद्धा राबवली जाणार आहे. नौदलाने अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेमध्ये बदल केलेला आहे. आधी यांची ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. आणि त्याच्या नंतर निवड झालेल्या उमेदवारांना मेरिटनुसार प्रक्रियेकरीता बोलावले जाणार आहे. लष्कराच्या भरती दरम्यान प्रचंड गर्दी होते, आणि त्याकरीता लष्कराला बरीच तयारी करावी लागते. आणि त्याच बरोबर उमेदवारांची संख्या सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात असते. हा ताण कमी करण्यासाठी शासनाने आधी लेखी परीक्षा घेऊन, नंतर शारीरिक व वैद्यकीय चाचणी घेण्याचा निर्णय हा घेतला आहे.
त्या सोबतच परीक्षा सुद्धा ऑनलाईनच होणार आहे. जी लेखी परीक्षा अग्निवीरांकरिता घेतली जाणार आहे, त्यासाठी विविध ठिकाणी लेखी परीक्षा घेतली जाणार आहेत. आणि त्यासाठी असणारे ठराविक जे केंद्र आहे ते विद्यार्थ्यांना कळवले जाणार आहेत. त्यामुळे एकच ठिकाणी मोठी गर्दी होणार नाही. आणि परीक्षा सुद्धा वेळेवरती पार पडतील. आणि त्याच्या नंतरच मेरिटनुसार पुढील प्रक्रिया करण्यात येईल.
अधिक माहिती साठी खालील ऑफिशियल वेबसाईट ला भेट द्या -
https://www.joinindianarmy.nic.in/default.aspx
إرسال تعليق