Khandesh Darpan 24x7

दि.९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान फैजपूर येथे झालेल्या युवक महोत्सवाचा समारोप जल्लोषात

 



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी  


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळाचे धनाजी नाना कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर प्रताप महाविद्यालय, अमळनेरचा संघ उपविजेता ठरला. 




दि.९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान फैजपूर येथे झालेल्या युवक महोत्सवाचा समारोप सोमवारी प्रसिध्द अभिनेते गौरव मोरे यांच्या उपस्थितीत जल्लोषात झाला. 



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पवार, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, व्य. प. सदस्य तथा युवारंगचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे हजर होते. 




याशिवाय स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. सुधाकर चौधरी, अधिसभा सदस्य प्राचार्य सुनील पवार,  प्रा. एकनाथ नेहेते, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, प्रा. पदमाकर पाटील, प्रा. संदीप नेरकर, अमोल मराठे, नेहा जोशी, दिनेश चव्हाण, स्वप्नाली महाजन, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, संस्थेचे पदाधिकारी लिलाधर चौधरी, प्रा.नंदकुमार भंगाळे, प्रा.एस.एस.पाटील, किशोर चौधरी, मुरलीधर फिरके, प्रा. डी. ए. नारखेडे, मिलींद वाघुळदे, संजय चौधरी, प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, प्राचार्य आर. एल. चौधरी, डॉ. अजित थोरबोले, धनंजय चौधरी, समन्वयक प्रा. शंकर जाधव, सहसमन्वयक प्रा. राकेश तळेले यांची उपस्थिती होती. 




यावेळी बोलतांना ......

गौरव मोरे यांनी “मना देश जय जय खान्देश ”  या वाक्याने सुरुवात केली.  सादरीकरणाच्या वेळी पडलेल्या टाळया म्हणजे पारितोषिक असते.  पारितोषिक मिळाले नाही तरी शेवटपर्यत प्रयत्न करा. यश मिळेल. असा सल्ला देत आम्ही देखील अशाच व्यासपीठावर कला सादर करुन पुढे आलो आहोत.  मात्र मेहनत आणि परिश्रमाची तयारी ठेवा असे ते म्हणाले. 




डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, इतर कलावंतांकडून प्रेरणा घेतली तर यश नक्की मिळेल. पुढील युवारंगची जबाबदारी विद्यापीठाने आमच्या संस्थेकडे दिल्यास चांगले आयोजन करु असे ते म्हणाले.  


प्रदीप पवार यांनी आपल्या मनोगतात चारित्र्य संवर्धन जपणे महत्त्वाचे असते असा सल्ला देत अशा महोत्सवातून खान्देशातील तरुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. 


कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे म्हणाले की, या महोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्साह आणि जोश पाहून नियेाजन करण्यात आनंद प्राप्त झाला, विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविण्यात विद्यापीठ नेहमीच अग्रेसर राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली. 




अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू प्रा.एस. टी. इंगळे यांनी केवळ कलावंत म्हणून मोठे न होता त्यासोबत माणूस म्हणून देखील मोठे व्हा.  यशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका. आपल्यातील उणीवा शोधून त्या दूर करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन केले. 


प्रा.सुधाकर चौधरी यांनी मोठयांचा आदर करणे ही आपली संस्कृती असून तीचा विसर पडू देऊ नका यश तूमच्या मागे येईल असे मत व्यक्त केले.  


धनंजय चौधरी यांनी स्पर्धा जिंकण्यासाठी असतात तसेच आठवणी जपण्यसाठी देखील असतात.  त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत सहभाग महत्त्वाचा असतो असे मनोगत व्यक्त केले. 



प्रारंभी कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी सिलबंद पाकीटातून प्र-कुलगुरुंकडे निकाल सुपूर्द केला.  यावेळी सहभागी विद्यार्थ्यांकडून अमोल पाटील, संघ व्यवस्थापकांपैकी प्रा.हरेश चौधरी, प्रा. विजय पालवे, डॉ. नंदा वसावे यांनी मनोगत व्यक्त केले.  


प्राचार्य पी. आर. चौधरी, प्रा. एस.व्ही.जाधव, प्रा. राकेश तळेले, शेखर महाजनतुषार फिरके यांचा सन्मान करण्यात आला. 


सूत्रसंचालन डॉ.राजेंद्र राजपूत व डॉ.राजश्री नेमाडे यांनी केले. प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी आभार मानले. 


युवारंग स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:-


1) संगीत विभाग






शास्त्रीय वादन (तालवाद्य) :- 


प्रथम    --  मु. जे. महाविद्यालयजळगाव.

द्वितीय -- एस. एस. मणियार विधी महाविद्यालयजळगाव .

तृतीय -- महात्मा गांधी शि.मं.चे कलाविज्ञान व वाणिज्य महाविद्यालयचोपडा.


शास्त्रीय वादन (स्वरवाद्य):-


प्रथम    --  महात्मा गांधी शि.मं.चे कलाविज्ञान व वाणिज्य महाविद्यालयचोपडा.

द्वितीय -- मु. जे. महाविद्यालयजळगाव.

तृतीय -- आय. एम. आर.जळगाव.


   गायन 


शास्त्रीय गायन :-

प्रथम    --  मु. जे. महाविद्यालयजळगाव.

द्वितीय -- पु. ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ.
 

तृतीय -- महात्मा गांधी शि.मं.चे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा.


सुगम गायन (भारतीय) :-


प्रथम    --  मु. जे. महाविद्यालयजळगाव.

द्वितीय -- पु. ओ. नाहाटा महाविद्यालयभुसावळ.

तृतीय -- प्रताप महाविद्यालयअमळनेर.

पाश्चिमात्य गायन :- 


प्रथम    --  प्रताप महाविद्यालयअमळनेर.

द्वितीय -- महात्मा गांधी शि. मं.  कलावाणिज्य, विज्ञान महाविद्यालयचोपडा.

तृतीय -- जी. एच. रायसोनी इन्स्टीट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटजळगाव.

समुह गायन (भारतीय):-


प्रथम    --  प्रताप महाविद्यालयअमळनेर.

द्वितीय -- मु. जे.महाविद्यालयजळगाव.

तृतीय -- महात्मा गांधी शि. मं. कलावाणिज्य, विज्ञान महाविद्यालयचोपडा.

समुह गायन (पाश्चिमात्य):- 


प्रथम    --  महात्मा गांधी शि. मं. कलावाणिज्य, विज्ञान महाविद्यालयचोपडा.

द्वितीय -- मु. जे.महाविद्यालयजळगाव.

तृतीय -- प्रताप महाविद्यालयअमळनेर.


    संगीत 

नाट्य संगीत :-  


प्रथम    --  मु. जे. महाविद्यालयजळगाव.

द्वितीय -- पु. ओ. नाहाटा महाविद्यालयभुसावळ.

तृतीय -- क. ब. चौ. उमवि शैक्षणिक प्र. शाळाजळगाव.


लोकसंगीत (वाद्यवृंद):-


प्रथम    --  महात्मा गांधी शि. मं. कलावाणिज्य, विज्ञान महाविद्यालयचोपडा.

द्वितीय -- मु. जे. महाविद्यालयजळगाव.

तृतीय -- प्रताप महाविद्यालयअमळनेर.


पाश्चिमात्य वाद्यसंगीत:-


प्रथम    --  मु. जे. महाविद्यालयजळगाव.

द्वितीय -- जी. एच. रायसोनी इन्स्टीट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटजळगाव.

तृतीय -- पी.एस.जी.व्ही.पी.एस. महाविद्यालयशहादा.



2) नृत्य विभाग











समुह लोकनृत्य:-  


प्रथम    --  प्रताप महाविद्यालयअमळनेर.

द्वितीय -- मु. जे. महाविद्यालयजळगाव.

तृतीय -- महात्मा गांधी शि. मं. कलावाणिज्य, विज्ञान महाविद्यालयचोपडा.



शास्त्रीय नृत्य:- 


प्रथम    --  मु. जे. महाविद्यालयजळगाव.

द्वितीय -- जी. एस. रायसोनी इन्स्टीटयुट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटजळगाव.

तृतीय -- नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालयचाळीसगाव.



३) साहित्य कला 





वक्तृत्व:- 


प्रथम    --  विद्यावर्धिनी महाविद्यालयधुळे.

द्वितीय -- प्रताप महाविद्यालयअमळनेर.

तृतीय -- श्रमसाधना बॉम्बे ट्रस्टचे कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालयबांभोरी.


वादविवाद:- 


प्रथम    --  विद्यावर्धिनी महाविद्यालयधुळे.

द्वितीय -- प्रताप महाविद्यालयअमळनेर.

तृतीय -- डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयजळगाव.




४) नाट्य कला








विडंबन नाट्य:- 

प्रथम    --  प्रताप महाविद्यालयअमळनेर.

द्वितीय -- एस. एस. व्ही. पी. एस. कला व वाणिज्य महाविद्यालयधुळे.

तृतीय -- पू. सा.गु.वि.प्र.मंडळाचे फार्मसी महाविद्यालयशहादा.


मुक नाट्य:-  


प्रथम    --  मु. जे. महाविद्यालयजळगाव.

द्वितीय -- प्रताप महाविद्यालयअमळनेर.

तृतीय -- पू. सा.गु.वि.प्र.मंडळाचे फार्मसी महाविद्यालयशहादा.

 मिमिक्री:- 


प्रथम    --  मु. जे. महाविद्यालयजळगाव.

द्वितीय -- महात्मा गांधी शि. मं. कलावाणिज्य, विज्ञान महाविद्यालयचोपडा.

तृतीय -- पू. सा.गु.वि.प्र.मंडळाचे फार्मसी महाविद्यालयशहादा.



५) ललित कला







रांगोळी:- 


प्रथम    --  मु. जे. महाविद्यालयजळगाव.

द्वितीय -- एस. पी. डी. एम. महाविद्यालयशिरपूर.

तृतीय -- कलावाणिज्यविज्ञान  महाविद्यालय,  कुऱ्हा कोकोडा.



व्यंगचित्र:-


प्रथम    --  शिरीष चौधरी महाविद्यालयजळगाव.

द्वितीय -- महात्मा गांधी शि. मं. कलाविज्ञान व वाणिज्य महाविद्यालयचोपडा.

तृतीय -- मु. जे. महाविद्यालयजळगाव.


कोलाज:- 


प्रथम    --  महात्मा गांधी शि. मं. कलाविज्ञान व वाणिज्य महाविद्यालयचोपडा.

द्वितीय -- मु. जे. महाविद्यालयजळगाव.

तृतीय -- डॉ.अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयजळगाव.


क्ले मॉडेलिंग:-


प्रथम    --  धनाजी नाना महाविद्यालयफैजपूर.

द्वितीय -- महात्मा गांधी शि.मं. कलाविज्ञान व वाणिज्य महाविद्यालयचोपडा.

तृतीय -- मु. जे. महाविद्यालयजळगाव.


स्पॉट पेंटिग:- 


प्रथम    --  बी. पी. आर्टसएस.एम.ए. सायन्सके.के.सी. कॉमर्स कॉलेजचाळीसगाव .

द्वितीय -- मु. जे. महाविद्यालयजळगाव.

तृतीय -- संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयमुक्ताईनगर.


पोस्टर मेकींग:-


प्रथम    --  के. सी. ई. शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयजळगाव.

द्वितीय -- मु. जे. महाविद्यालयजळगाव.

तृतीय -- बी. पी. आर्टसएस. एम. ए. सायन्सके.के.सी. कॉमर्स कॉलेजचाळीसगाव.


इन्स्टॉलेशन:- 


प्रथम    --  सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयऐनपूर.

द्वितीय -- प्रताप महाविद्यालयअमळनेर.

तृतीय -- बी. पी. आर्टसएस. एम. ए. सायन्सके.के.सी. कॉमर्स कॉलेजचाळीसगाव.


फोटोग्राफी:-


प्रथम    --  महात्मा गांधी शि. मं. कलाविज्ञान व वाणिज्य महाविद्यालयचोपडा.

द्वितीय -- के. सी. ई. शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयजळगाव.

तृतीय -- शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयजळगाव.


मेहंदी:-


प्रथम    --  शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयजळगाव.

द्वितीय -- श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालयपाचोरा.

तृतीय -- काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालयनंदुरबार.


पोस्टर प्रदर्शन :-


प्रथम    --  धनाजी नाना महाविद्यालयफैजपूर.

द्वितीय -- शहादा तालुका केा-ऑप एज्य. सोसा.चे विज्ञान महाविद्यालयशहादा .

तृतीय -- मु. जे. महाविद्यालयजळगाव .



गट निहाय विजेतेपद 


१. संगीत गट : मु.जे.महाविद्यालय,जळगाव.


२. नृत्य गट : मु. जे. महाविद्यालयजळगाव.


३. साहित्य कला गट :  विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे.


४. नाट्य गट : मु. जे. महाविद्यालयजळगाव आणि प्रताप महाविद्यालय, अमळनेर.


५. ललित कला गट : मु. जे. महाविद्यालयजळगाव.      




जिल्हानिहाय प्रोत्साहनपर फिरतेचषक

 

जळगाव जिल्हा (डॉ.अरविंद चौधरी पुरस्कृत स्व.वसुंधरा चौधरी चषक ) : 


महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, चोपडा.

 

धुळे जिल्हा (प्रा.मुक्ता महाजन पुरस्कृत स्व.शांताबाई महाजन चषक ) :    

 

विद्यावर्धिनी  महाविद्यालय, धुळे.

 

नंदुरबार जिल्हा (प्रा.सुनील कुलकर्णी पुरस्कृत स्व.बाबुराव कुलकर्णी देशगव्हाणकर चषक) :


पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा.



सर्वसाधारण विजेतेपद  

 

विजेता       :  मु. जे. महाविद्यालयजळगाव.  (डॉ. जी.डी.बेंडाळे स्मृती चषक) 

 



उपविजेता  :  प्रताप महाविद्यालय, अमळनेर.  (कै.कुसुमताई मधुकरराव चौधरी स्मृती चषक)  






अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा




Post a Comment

أحدث أقدم