महाशिवरात्री उत्सव सावदा जवळ असलेले दसनुर गाव व तिथे असलेली स्वयंभू महादेवाची पिंड फार रहस्यमयी आहे कथे प्रमाणे एका व्यक्तीच्या स्वप्नात साक्षात्कार झाला व गावाबाहेर सांगितल्याप्रमाणे खोदकाम केले असता तिथे स्वयंभू महादेवाची पिंड निघाली पिंड पूर्ण बाहेर काढण्याचा गावकऱ्यांचा हेतू होता पण शेवटी 300 फूट खोल गेले असता पाणी लागले पण पिंडचा अंत झाला नाही म्हणून मंदिर तेथेच बांधण्यात आले सुमारे ८०० वर्षा पूर्वीचे हे प्राचीन मंदिर असल्याचा इतिहास आहे.
ही पिंड वरतून गोल व थोड्या अंतरावर अष्टपैलू आहे. शिवरात्री निमित्त गावातून महाकाल प्रतिमेची मोठी मिरवणूक काढली जाते व रांगोळ्या, पुष्प वर्षाव करून पूर्ण गाव व पंचक्रोशीतील भाविक हजेरी लावतात तसेच रात्री जागरण भजन कार्यक्रम असतो.
पंचक्रोशितील हे स्वयंभू शिवलिंग असून भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे असल्याने येथे भाविक हजारोंच्या संख्येने हजेरी लावतात.
महाशिवरात्रीला संध्याकाळी ६ वाजेनंतर महादेवाच्या मुकूटाची गावातून पारंपरिक वादयांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येते. मिरावणुकीनंतर महादेव मंदिरात रात्री महाशिवरात्रीच्या जागराचे भजन होते. मंदिरात ग्रामस्थांतर्फे फराळ वाटप करण्यात येते.
या उमेश्वर महादेव मंदिरास "क" वर्ग तीर्थक्षेत्र याची मान्यता मिळालेली आहे. भक्तनिवास ची उभारणी सुद्धा याठिकाणी करण्यात आलेली आहे. गेल्या २० ते २५ वर्षापासून येथे भागवत सप्ताह, भजन, कीर्तन, अखंड हरिनाम सप्ताह, सकाळ - संध्याकाळ हरिपाठ चे आयोजन करण्यात येते.
إرسال تعليق