पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून
ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी
आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते.
शिवाजी महाराज हे मराठा कुटुंबातील आणि भोसले कुळातील होते.
शिवकार्यात
लढवय्ये सैनिक तर सहभागी होतेच, परंतु सर्वसामान्य रयत सुद्धा आपल्या
परीने सहभागी होती आणि हे फार महत्त्वाचं होतं. राजाच्या कार्यात जेव्हा रयत
मनापासून सहभागी असते तेव्हा ते कार्य यशस्वी होतं. खरं म्हणजे ते कार्य राजाच
नसतं तर सर्व रयतेचं असतं आणि म्हणूनच यशस्वी होतं !
शिपाई, सहकारी
व रयत शिवकार्यात सर्वस्वाचा त्याग करित सहभागी होती, या
शिवकाळातील रयतेला शिवाजींचे कार्य व शिवाजींचे राज्य हे आपले राज्य आहे असे वाटत
होते. "शिवाजी राजा जगलाच पाहिजे" अशी जिद्दीची व ठाम भूमिका रयतेची होती कारण शिवाजीराजेंनी जे कार्य आरंभिले आहे ते
आपले स्वतःचे कार्य आहे. आणि आपल्या सर्वांसाठी कल्याणकारी आहे. म्हणुन या
शिवकार्यात निष्ठावान मावळ्यांसोबतच रयतेने या राजासाठी आपल्या प्राणाची आहुती
दिली कारण लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे.
राजमुद्रा
राजमुद्राछत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा
कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार
केली. शहाजीराजे व जिजाबाई यांची मुद्रा पारशी भाषेत होती, पण
शिवाजी महाराजांनी राजमुद्रेसाठी संस्कृत भाषेचा वापर केला. या राजमुद्रेवरील मजकूर खालीलप्रमाणे...
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते".
ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत
जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल
असा याचा अर्थ होतो.
मृत्यू
हनुमान जयंतीच्या
पूर्वसंध्येला ३-५ एप्रिल १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी, शिवाजी महाराजांचा
मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण वादग्रस्त आहे. ब्रिटीश नोंदी सांगतात की १२
दिवस आजारी राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
छत्रपती शिवाजी
महाराज |
|
|
|
मराठा साम्राज्य |
|
अधिकारकाळ |
जून ६, १६७४ ते एप्रिल ३, १६८० |
राज्याभिषेक |
जून ६, १६७४ |
राज्यव्याप्ती |
पश्चिम महाराष्ट्र, कोकण, |
राजधानी |
रायगड किल्ला |
पूर्ण नाव |
शिवाजीराजे शहाजीराजे भोसले |
जन्म |
फेब्रुवारी १९, १६३० |
शिवनेरी किल्ला, पुणे |
|
मृत्यू |
एप्रिल ३, १६८० |
रायगड |
|
उत्तराधिकारी |
छत्रपती संभाजीराजे भोसले |
वडील |
शहाजीराजे भोसले |
आई |
जिजाबाई |
पत्नी |
सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, सगणाबाई,
गुणवंतीबाई |
राजघराणे |
भोसले |
राजब्रीदवाक्य |
'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।' |
चलन |
होन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन) |
Post a Comment