Khandesh Darpan 24x7

सावदा येथील श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील कन्या विद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न


प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी  


सावदा येथील श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यालयात वर्षभरात विविध परीक्षांमध्ये व विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींना पारितोषिक वितरण करण्यात आले. 


मागील वर्षी इयत्ता दहावी मध्ये प्रथम आलेल्या दर्शना मधुकर पाटील हिचा विविध पारितोषिके देऊन रावेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. 


त्याचबरोबर कोमल अनिल बारी, तेजश्री विकास बावणे, गुंजन पाटील, रितिका भिरूड आदी विद्यार्थिनींना देखील इयत्ता दहावी मध्ये घवघवीत यश मिळाल्याबद्दल फैजपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी कैलास कडलक यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. 


दर्शना मधुकर पाटील



कोमल अनिल बारी


रितिका भिरूड 



गुंजन पाटील



या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना आणि नृत्य सादर केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रावेर येथील गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे व पोलिस निरीक्षक जालिंदर पळे हे उपस्थित होते.


याव्यतिरिक्त माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी, फिरोज पठाण सावद्यातील प्रतिष्ठित उद्योजक मनोज पाटील युवा समाजसेवक सुरज परदेशी माजी उपमुख्याध्यापक बी.एस. राणे, पत्रकार श्याम पाटील, प्रवीण पाटील, राज चौधरी आदी उपस्थित होते. 


प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी मराठी शाळेत शिकतो म्हणून स्वतःला कमी लेखू नका. शिक्षकांवर विश्वास ठेऊन अभ्यास केल्यास कॉपी ची गरज पडत नाही असे प्रतिपादन केले. तर गटशिक्षणाधिकारी शैलेश दखने यांनी नगरपालिका संचालित शाळा असूनही विद्यार्थी खाजगी इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांपेक्षा कुठेही कमी नाही. असे कौतुक केले. 


प्रास्ताविक मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे यांनी तर अहवाल वाचन पी.जी.भालेराव यांनी केले. पारितोषिक वितरणानंतर लगेचच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप दिला गेला. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 


कार्यक्रम यशस्वीते साठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे, पर्यवेक्षक पी.जी.भालेराव, जी.बी.तडवी, संजय भोई, संजीव झांबरे, स्वप्नील वंजारी, राधाराणी टोके, निर्मला बेंडाळे, चारुलता चौधरी, मोहिनी राणे, कल्पना देवकर, विनोद महेश्री, सुभेदार तडवी, सुलभ मेढे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजेश जावळे तर आभार प्रदर्शन सचिन सकळकळे यांनी केले.


तसेच या वेळी विद्यालयाचे शिक्षक सचिन सकळकळे यांचा मुलगा समर्थ सकळकळे याने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविल्या बद्दल तर स्वप्नील वंजारी यांचा मुलगा आयुष याने एरोबिक्स मध्ये सिल्व्हर मेडल प्राप्त केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. 







अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post