प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा नगरपरिषदेचे कोणतीही अतिरिक्त करवाढ नसलेला सं २०२३-२४ अर्थसंकल्प मा. प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सावदा यांनी दि.२२/०२/२०२३ रोजी मंजूर केला. सदर अर्थसंकल्पात विविध विकास कामात शासकीय योजना मध्ये प्राप्त होणाऱ्या अनुदानातून भरीव तरतूद करण्यात आल्या आहेत. तसेच अमृत २.० या योजनेखाली पाणीपुरवठा योजनेसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्प -- >
एकूण अर्थसंकल्प - 78,48,13,348 (अठ्यात्तर कोटी अठ्ठेचाळीस लाख तेरा हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये )
भांडवली जमा - 48,55,55,000 (अठ्ठेचाळीस कोटी पंचावन्न लाख पंचावन्न हजार रुपये)
भांडवली खर्च - 58,94,90,000 (अठ्यावन्न कोटी चौर्यांन्नव लाख नव्वद हजार रुपये)
महसूल जमा - 13,70,16,000 (तेरा कोटी सत्तर लाख सोळा हजार रुपये )
महसूल खर्च - 19,28,73,300 (एकोणवीस कोटी अठ्ठावीस लाख त्र्याहत्तर हजार तीनशे रुपये)
सदर अर्थसंकल्प मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली लेखापाल विशाल पाटील, अंतर्गत लेखापरीक्षक भारती पाटील व सहकारी यांनी तयार करून सादर केला.
إرسال تعليق