Khandesh Darpan 24x7

लैंगिक आजार आणि आहाराविषयी जागरुक राहणे गरजेचे - डॉ. राजश्री नेमाडे



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी  


धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर च्या IQAC विभाग द्वारा नुकतेच लैंगीक स्वास्थ आणि आहार जनजाग्रूती या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले. 


या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. उदय जगताप  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना सांगितले -  दैनंदीन आहारात क्रुत्रिम एवजी नैसर्गिक अन्न घटकांचा समावेश करावा तसेच युवकांनी व सर्वच नागरिकांनी मादक द्रव्य व इतर व्यसनांकडे न वळता स्वत:ला व्यायामाचे व्यसन  लाऊन घ्यावे त्याने सारखे सारखे होणारे आजार टळतील आणि पर्यायाने आर्थिक आणि मानसिक आधार मिळेल. म्हणुन प्रत्यकाने स्वतः च्या शरीराचे संवर्धन करा असा मोलाचा सल्ला उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना  दिला. 




प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. राजश्री पी. नेमाडे  यांनी स्त्री आणि पुरुष यांच्यामधील संप्रेरके आणि त्यांचा शरीरावर होणारा परीणाम तसेच त्यांच्यातील  विविध लैंगीक आजारांविषयी सविस्तर माहिती देऊन मोलाचे मार्गदर्शन केले.



या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांचे  लाभले तसेच प्रा. डॉ. कल्पना पाटील, प्रा. डॉ. जयश्री पाटील, प्रा. डॉ. सीमा बारी, प्रा. डॉ. पल्लवी भंगाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 



कार्यक्रमाचे प्रस्ताविक ची जबाबदारी  प्रा. डॉ. टी. एम. सावसाकडे यांनी सांभाळली तर सूत्र संचलन  प्रा. शुभांगी पाटील यांनी करून आभार प्रा. डॉ.सविता वाघमारे यांनी मानले.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post