प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल (आय. क्यू. ए .सी ) व मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 मार्च 2023 शनिवार रोजी एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले.
सेमिनारचा विषय "महिला आणि मानसिक आजार" हा होता. आदरणीय प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ प्रा. डॉ. कल्पना पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सीमा बारी यांनी मांडले तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्षीय स्थान डॉ. ताराचंद सावसाकडे यांनी भूषविले.
या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले उपप्राचार्य डॉ. शंकर व्ही. जाधव हे होते. त्यांनी "महिला व मानसिक आजार" या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
सरांनी मानसिक आजार म्हणजे काय ते सांगून प्रत्येक व्यक्तीमध्ये हे देव, राक्षस व मानव असतो हे त्यांनी ईद, इगो, आणि सुपर इगो यांच्या माध्यमातून सविस्तरपणे स्पष्ट केले तसेच ते कशा प्रकारे कार्य करतात हे सांगितले तसेच स्त्रियांकडे इमोशनल बॅलेन्स असावा इमोशनल बॅलेन्स नसल्यास व्यक्तीवर ताण निर्माण होतो असे देखील सांगितले तसेच हिस्टेरिया हा रोग फक्त स्त्रियांनाच होतो असे पूर्व कालखंडात दिसून येते त्याचप्रमाणे "अंगात येणे" हा एक मानसिक आजार आहे हे देखील स्पष्ट करून सांगितले.
मानसिक आजाराची रूपे देखील सरांनी सांगितले त्यामध्ये अतिसुरक्षितता याच्यामुळे व्यक्ती मानसिक विकाराला बळी पडू शकते. स्त्रियांनी प्रत्येक वेळी अनुभवातून कसे शिकावे वास्तवाची नेहमी भान ठेवावे. आयुष्यात कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे व नेहमी पालक आणि पाल्य यांच्यात संवाद होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
सायकोसिस, न्यूरोसिस, इन्फॉरिटी कॉम्प्लेक्स हे देखील वेगवेगळे मानसिक आजार आहे असे सांगितले तसेच स्त्रियांमध्ये एक प्रचंड ऊर्जा आणि शक्ती असते त्याचा सकारात्मक वापर करावा व मनाला स्थिर ठेवावे याविषयी मार्गदर्शन केले.
परीक्षेमध्ये नापास झाले तर त्याचे एवढी खंत नाही पण जीवनाच्या परीक्षेत नापास होऊ नये अशी समायोजन क्षमता व्यक्तीने मिळविणे गरजेचे आहे. नक्कल करू नका, स्वतःशी प्रामाणिक राहा. तुमच्यासारखे तुम्हीच आहात एकमेव द्वितीय. तसेच माहिती तंत्रज्ञानासाठी इंग्रजी शिकणे गरजेचे आहे असे देखील मत मांडले.
कार्यक्रमाचे आभार प्रा. शुभांगी पाटील यांनी केले तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. गोपाळ जी. कोल्हे, जेष्ठ प्रा. डॉ. राजश्री नेमाडे, प्रा. डॉ. जयश्री पाटील, डॉ.पल्लवी भंगाळे डॉ. कल्पना पाटील, डॉ.सविता वाघमारे,प्रा.शुभांगी पाटील, प्रा. धीरज खैरे यांनी अनमोल सहकार्य केले. तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
إرسال تعليق