Khandesh Darpan 24x7

श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय येथे संस्कृत शास्त्री संमेलन तसेच नूतन इमारत उद्घाटन समारंभ...


प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी  


फैजपुर तालुका यावल येथील भारतातील एकमेव संस्कृत सेवाभावी संस्था श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयच्या  नूतन इमारतीचे उद्घाटन समारंभ सोहळा तथा संस्कृत शास्त्री संमेलन दिनांक १८ व १९ मार्च या दिवशी आयोजित केलेला आहे. दि. १६ मार्च २०२३ रोजी आचार्य सुरेशराज मानेकर बाबा आणि प्राचार्य राजधर बाबा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.


सविस्तर वृत्त असे कि, भारतातील एकमेव संस्कृत महाविद्यालय असलेले सेवाभावी श्रीचक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय फैजपूर या नूतन इमारतीचे उद्घाटन समारंभ तथा संस्कृत शास्त्री संमेलन दि १८, १९ मार्च  रोजी श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय फैजपूर च्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला असून या संमेलनात भारतभरातून पाचशे महानुभाव पंथाचे  संत उपस्थित राहणार आहे.



श्री चक्रधर गुरुकुल चा थोडक्यात इतिहास 


पूर्वीच्या काळात महानुभाव समाजातील साधक संत मंडळींना शास्त्री होण्यासाठी हरिपूर हजारा येथे संस्कृत भाषेचे शिक्षण घेण्यासाठी जावे लागत होते. त्या काळात सद्भक्त मंडळीनी ठरविले कि, महाराष्ट्रात आपल्या परिसरातच जर अशी पाठशाळा / गुरुकुल सुरु करायची कि तेथे संस्कृत भाषेचे ज्ञान आपल्या साधक संत मंडळींना मिळेल. त्याकाळात संस्कृत शिक्षण घेण्याची साधक भक्तांमध्ये खूप आवड होती. आणि म्हणून केशव इच्छयाराम नामक सदगृहस्त यांनी आपल्या मालकीची जवळपास एक ते सव्वा एकर जमीन या संस्कृत पाठशाळे साठी दान म्हणून दिली. आणि सन १९६१ साली बांधकाम पूर्ण करून  संस्कृत पाठशाळा सुरु झाली. 


श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाची फैजपूर येथे आचार्य महंत श्री आराध्य मुरलीधर शास्त्री यांनी सन १९६१ साली स्थापना केली. याला आज ६२ वर्ष पूर्ण झालीत.


या पाठशाळेतून आजपर्यंत जवळपास २५० ते ३०० संत मंडळी उत्तीर्ण होऊन संस्कृत शास्त्री पदवी नागपूर विद्यापीठ अंतर्गत घेऊन पंथाचा संस्कृत भाषेचा तसेच महानुभाव संप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्याचे काम आज करत आहेत. 



या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्रामुख्याने  अखिल भारतीय  महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आचार्य  विद्वांस बाबा शास्त्री फलटण हे राहतील. तर आचार्य बाभुलगावकर बाबा शास्त्री करमाड, आचार्य खामणीकर बाबा कनाशी, आचार्य नागराजबाबा शास्त्री औरंगाबाद, आचार्य राहेरकर बाबा, आचार्य संतोषमुनी शास्त्रि औरंगाबाद, आचार्य रिधपूरकर शास्त्री, श्री. आचार्य प्रवर न्यायबास बाबा, श्री. आचार्य प्रवर माहूरकर बाबा हे उपस्थित राहणार आहे.


याप्रसंगी नूतन इमारत उद्घाटन सुशील के बाफना (पप्पु सेेठ  जळगांव) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 


यापत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष वसंत विश्वनाथ महाजन तांदळवाडी, महाविद्यालयाचे प्राचार्य राजधर बाबा शास्त्री, उपप्राचार्य कृष्णराज शास्त्री, राज शास्त्री बांधकर नागपूर, साहित्याचार्य राजधर बाबा शास्त्री नागपूर, प्रा., डॉ.गोविंद शास्त्री जामोदेकर नागपूर, हरिपाळ शास्त्री राहेरकर, प्रदीप महाराज पंजाबी, खिर्डी  यांची  उपस्थिती होती. 


कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे -


दि. १८ मार्च  शनिवार --

सकाळी ६ ते ८  देवास मंगलस्नान, विडावसर अर्पण, गीता पारायण

सकाळी ९ ते १२ संस्कृत शास्त्री संमेलन सत्र १ ले 

दुपारी ३ ते ५  संस्कृत शास्त्री संमेलन सत्र २ रे 

संध्याकळी ६ ते ८ शोभा यात्रा

रात्री ९ वा.  संस्कृत शास्त्री गणाचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार.


दि. १९ मार्च रविवार - 

सकाळी ६ ते ८ देवास मंगलस्नान, विडावसर अर्पण, 

सकाळी ७  ते ८  गीता पारायण 

सकाळी ९ ते १२ या मध्ये प्रवेशद्वार उद्घाटन ध्वजारोहण नूतन इमारत उद्घाटन.

दुपारी १२  ते ३  महाप्रसाद



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

Previous Post Next Post