Khandesh Darpan 24x7

सावदा सोमेश्वर नगर मध्ये बंद घराला चोरट्यांनी केले लक्ष : मुद्देमाल लंपास...!



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


सावदा येथील डॉक्टर कुलकर्णी यांच्या हॉस्पिटलच्या मागे असलेले सोमेश्वर नगर या भागामध्ये गट नंबर 574 मध्ये येथील बांधकाम विभागातील  सेवानिवृत्त कर्मचारी देविदास गंभीर तायडे यांच्या बंद घराला चोरट्यांनी टार्गेट करून मुद्देमाल लंपास करण्यात त्यांना यश आले आहे. 



याबाबत सविस्तर वृत्त असे की, देविदास गंभीर तायडे यांनी नुकतेच नवीन घराचे बांधकाम केले आणि त्यामध्ये आवश्यक असा सर्व संसारी सामान शिफ्ट केला त्यानंतर तिथे राहायला जाऊ अशा प्रयत्नात ते होते मध्ये मध्ये जाऊन त्या घराची साफसफाई करायचे आणि एक दिवसाने फेरी मारायचे घर काॅलनीे मध्ये शेवटी असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी दिनांक 29 मार्च रोजी या बंद घराचे कुलूप तोडून घरामधील गोदरेजच्या कपाटाचे लॉकर तोडून सामान अस्ताव्यस्त फेकून त्यातील दोन तोळ्याची मंगळसूत्र  किंमत 60 हजार रुपये आणि रोख रक्कम 50 हजार रुपये ऐकूण एक लाख दहा हजार रूपये  असा मुद्देमाल घेऊन मागच्या दरवाजाने पोबारा  केला. 

चोरट्यांनी रचलेल्या सर्व सामानाला फेकाफेक करून घराची चांगल्या प्रकारे झळती घेतलेली होती असे निदर्शनात आले. 


दिनांक 30 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता देविदास तायडे यांचा मुलगा आकाश हा घराची साफसफाई करण्याचे उद्देशाने केला असता त्याला घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले त्यांनी घरात जाऊन बघितले असता सर्वसामान अस्ता व्यस्त दिसून आला गोदरेज कपाट उघडे व त्यांतील सामान फेकलेला दिसल्यावर त्याच्या लगेच लक्षात आले की आपल्या घरामध्ये चोरी झालेली आहे आणि तात्काळ सर्वांना  बोलवून या गोष्टीची माहिती दिली तर याबाबत सावदा पोलिस स्टेशनला ही कळविण्यात आले.  

या भागामध्ये नगरपालिकेने पथदिव्यांचे तार बसवून किमान चार महिने झाले असतील मात्र आतापर्यंत पथदिवे लावण्यात नगरपालिकेला यश आले नाही


या भागांमध्ये रात्रीला संपूर्णपणे अंधार असतो या गल्लीमध्ये कोण फिरत आहे कोण जात आहे काहीही दिसायला समजत नाही चोरट्यांनी नेमक्या अंधाराचा फायदा घेऊन चोरी केली. 


नगरपालिकेने भविष्यात होणाऱ्या चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी व या भागात साप विंचू गोम  असे विषारी जीव फिरतात या धोकेदायी परिस्थितीपासून येथील नागरिकांना जीवे धाक पडू नये म्हणून लवकरात लवकर पथदिवे लावून नागरिकांची सुरक्षा करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم