Khandesh Darpan 24x7

धनाजी नाना महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


फैजपुर येथे धनाजी नाना महाविद्यालयातील विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.  याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर संस्थेचे अध्यक्ष, रावेर विधानसभेचे आमदार  शिरीषदादा चौधरी उपस्थित होते.


या प्रसंगी फैजपूर विभागीय प्रांत कार्यालयाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग तसेच प्राचार्य. राकेश चौधरी - लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव, युवा नेते धनंजय चौधरी, प्रदेश सरचिटणीस एन.एस.यु.आय. व तापी परिसर विद्या मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एस. के. चौधरी, चेअरमन लीलाधर चौधरी, व्हा. चेअमन के. आर. चौधरी, संस्थेचे सन्मा. पदाधिकारी डॉ. एस. एस. पाटील, संजय चौधरी, प्रा. एन. ए. भंगाळे, ओंकार सराफ, प्राचार्य. डॉ. पी. आर. चौधरी, उपप्राचार्य डॉ. ए. आय. भंगाळे, डॉ. यु. एस. जगताप, डॉ. एस. व्ही जाधव, डॉ. विलास बोरोले, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. जी. जी. कोल्हे, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. राजश्री नेमाडे इ. मान्यवर उपस्थित होते.


सकाळी ठीक 09:00 वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्वर्गीय धनाजी नाना चौधरी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आणि प्रेरणास्तंभास मानवंदना देवून कार्यक्रम स्थळी स्व.धनाजी नाना चौधरी व लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यअर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीषदादा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जीवनात एक जबाबदार व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास येण्यासाठी शिक्षणाबरोबरच इतर शैक्षणिक उपक्रमांमध्ये ही प्राविण्य मिळवणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.




फैजपूरचे विभागीय प्रांताधिकारी कैलास कडलग यांनीही विद्यार्थ्यांना वाणिज्य, विज्ञान या विद्याशाखां बरोबरच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्यासाठी कला शाखा अत्यंत महत्त्वाची आहे, तसेच सामाजिक शास्त्रांविषयी किंवा वैज्ञानिक व वाणिज्य या सारख्या विषयांची मांडणी करण्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी भाषा विषयांचा अभ्यास करून भाषेवर प्रभुत्व असणे ही तितकेच महत्वाचे आहे विचारांना चालना  देण्यासाठी भरपूर वाचन करावे असे सांगत यशस्वीतांचा गौरव केला.


तसेच तापी परिसर विद्या मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एस. के. चौधरी यांनी आपल्या मनोगतात ज्या-ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले आहे त्यांचा गौरव निश्चितच झाला पाहिजे परंतु ज्यांना पारितोषिक मिळाले नाही त्यांनीही पुढच्या वर्षी खूप मेहनत करून पारितोषिक कसे मिळवता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.


मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर उपस्थितांच्या हस्ते यशस्वीतांचा सत्कार करण्यात आला त्यात...





*कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरावर यशस्वी मानकरी*


मुली 


१) ऋतुजा गोपाळ पाटील --  एम. एस. सी. (रसायनशास्त्र),  प्रथम क्रमांक, 


२) योगिता किशोर राणे --  एम. एस. सी. (प्राणीशास्त्र),  द्वितीय क्रमांक


३) सुष्मिता प्रदीप वैद्य -- एम. ए. (हिंदी),  द्वितीय क्रमांक


४) दिपाली -- तृतीय वर्ष बी. एस.सी. (गणित),  द्वितीय क्रमांक


५) जयश्री घनश्याम पाटील -- एम. एस. सी. (रसायनशास्त्र)  तृतीय क्रमांक


६) कोमल माधव चौधरी -- एम. एस. सी. (वनस्पती शास्त्र),  तृतीय क्रमांक




*कनिष्ठ महाविद्यालय अकरावी आणि बारावी स्तरावर यशस्वी मानकरी*


मुली 


१) दिव्या गणेश पाटील -- बारावी (वाणिज्य)  वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक,


२) वसुधा चंद्रकांत वायकोळे -- बारावी (कला)  वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक

 

मुले 


१) अपूर्व गिरीश चौधरी -- बारावी (विज्ञान)  वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक,


२) कुणाल सुरेश कापसे -- बारावी (विज्ञान)  वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक,



१) *कला, विज्ञान, वाणिज्य तसेच बी. बी. ए.  आणि बी. सी. ए.  विभागातील यशस्वी मानकरी*


तृतीय वर्ष  प्रथम क्रमांक पटकावणारे  मानकरी 


मुली 


१) प्रियंका चंद्रकांत भालेराव --  राज्यशास्त्र विषयात, 

२) गीताली बाळ होले --  विज्ञान विषयात, 

३) धनश्री प्रभुदास जंजाळकर -- वाणिज्य शाखेत, 

४) धनश्री संतोष तांबट -- अर्थशास्त्र विषयात, 

५) उज्वला मधुकर बडे --  मराठी विषयात,


मुले 


१) तुषार गोपाळ महाजन --  वाणिज्य विषयात,

२) तुषार गोपाळ महाजन -- विज्ञान शाखेत, 

३) ऋषिकेश रामकृष्ण जावरे -- ॲडव्हान्स अकाउंटन्सी विषयात,


४) आकाश भगवंत सोनवणे -- इंग्रजी विषयात, 

५) समाधान सुपडू कोळी -- हिंदी विषयात, 

६) सुयश वाघुळदे --  पदार्थ विज्ञान विषयात,



२ )*कला, विज्ञान, वाणिज्य तसेच बी. बी. ए.  आणि बी. सी. ए.  विभागातील यशस्वी विद्यार्थी*


पदवी  अभ्यासक्रम   प्रथम क्रमांक पटकावणारे  मानकरी 

मुली 


१) पल्लवी जगन्नाथ अजलसोंडे -- एम. एस. सी.,  विषय - पदार्थविज्ञान, 


२) ऋतुजा गोपाळ पाटील  -- एम.  एस. सी.,  विषय - रसायनशास्त्र, 


३) सुष्मिता प्रदीप वैद्य -- एम.  ए.,  विषय - हिंदी, 


४) सुवर्णा हरी पाटील -- एम.  कॉम.,  विषय - वाणिज्य


मुले 


१) योगेश जगतानंद चौधरी  -- एम.  ए.,  विषय - मराठी, 


२) हर्षल रोहिदास बावस्कर -- एम.  कॉम.,  विषय - वाणिज्य


३) मोहन किशोर महाजन -- एम.  एस.  सी.,  विषय - पदार्थविज्ञान,


४) सुजित रोशन भाट -- एम.  एस. सी., विषय -  रसायनशास्त्र,


३ ) *कला, विज्ञान, वाणिज्य तसेच बी. बी. ए.  आणि  बी. सी. ए.  विभागातील यशस्वी विद्यार्थी*


 प्रथम क्रमांक पटकावणारे  मानकरी 


मुली 


१) नंदिनी दीपक जयस्वाल -- प्रथम वर्ष विज्ञान,   विषय - वनस्पती शास्त्र, 


२) आस्था अशोक बांनापुरे -- द्वितीय वर्ष  विज्ञान,  विषय - गणित,


३) वैशाली घनश्याम पाटील -- तृतीय वर्ष विज्ञान,  विषय - वनस्पती शास्त्र, 


४) उत्कर्षा रोहिदास तायडे -- तृतीय वर्ष,   विषय - इतिहास,


५) गौरी हेमंत चौधरी -- तृतीय वर्ष,  विषय - संगणक, 


मुले 

१) आफ्ताब दस्तगीर खाटीक -- बी. एस. सी.,  विषय - प्राणी शास्त्र, 




*लोकसेवक मधुकरराव चौधरी शिष्यवृत्ती पारितोषिक

राजश्री राजेंद्र कोळी, सेजल राजेश पाटील, रोहित सुनील पाटील, पूजा बोला सोनवणे, नयना रवींद्र पाटील. 


 *एन. एस. एस. विभाग*

एन.एस.एस. च्या माध्यमातून विद्यापीठ आणि शासन स्तरावर राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमात विशेष प्राविण्य मिळविण्यात यश --

 

धीरज बैरागी, मुर्तुजा अलमदार अली बोहरी, लीना बोंडे, शैलेश इंगळे, प्रशांत कोळी, वर्षा परदेशी, ईश्वर चौधरी, चेतन तळेले, गौरव सपकाळे, राहुल सोनवणे, बुद्धभूषण भालेराव, अनिकेत पाटील या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. 


*एन. सी. सी. विभाग*

एन. सी. सी. च्या माध्यमातून विद्यापीठ आणि शासन स्तरावर राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमात विशेष प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी --


मुले 


१) मराठे चेतन राज, 

२) श्रीखंडे मयूर यशवंत, 

३) चव्हाण गणेश उत्तम, 

४) भालेराव अनिकेत राजू, 

५) बोधडे रितेश संजय, 

६) चौधरी दुर्गेश नितीन, 

७) पाटील राजेश सिताराम, 

८) तायडे तुषार अनंतराव, 

९) महाजन हर्षल सुभाष 


या सर्व कडेट्स ची देश भारतील वेगवेगळ्या प्रशिक्षण शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करणारे कॅडेट म्हणून निवड करण्यात आली. 



*खेळ विभाग*


महाविद्यालय, विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळात विशेष प्राविण्य मिळणारे विद्यार्थी --


*बोक्सिग स्पर्धा:* 


मुली 


१) वसाने वैष्णवी जगदीश, 

२) बडे लक्ष्मी प्रमोद, 

३) कोळी वैशाली भागवत 


मुले 


१) तायडे भूषण जीवन, 


*धनुर्विद्या स्पर्धा:* 


मुली 


१) तायडे कविता रमेश, 

२) निळे जयश्री गंगाराम, 

३)धोत्रे योगिता, 

४) बावस्कर उज्वला नरेंद्र, 

५) कोळी करीना विलास,

६) कोळी तेजस्विनी विलास,



मुले 


१) कोळी प्रथमेश, 

२) संजय बारी, 

३) बाळू अजलसोंडे, 

४) जावडे विवेक भागवत, 

५) मेढे चिराग सुरेश,   

६) जावडे कैलास भागवत, 

७) राठोड निशांत अरुण, 

८) कोळी तेजस पितांबर.


*भरतोलान व शक्तीतोलन स्पर्धा:*  


मुली 


१) सोनवणे प्रेरणा किशोर, 

२) सोनवणे प्रियदर्शनी किशोर,

३) मराठे संध्या नारायण,

४) सोनवणे गायत्री संजय, 

५) वर्मा लीना सुनील,



मुले 


१) कोळी कन्हैया पितांबर, 

२) महाजन मनिष कैलास, 

३) सोनवणे वैभव प्रल्हाद, 

४) शिरसाळे वैष्णव गणेश 


*कुस्ती स्पर्धा:* 


मुली 


१) देवयानी संदीप चौधरी


*शरीर सौष्ठव स्पर्धा:* 


मुले 


१) हिवरकर रोहन ज्ञानेश्वर, 

२) चौधरी मयूर अशोक, 

३) सपकाळे भूषण कैलास, 

४) महाजन निलेश अरुण.


*त्वायकांडो स्पर्धा:*  


मुले 


१) महाजन पुष्पक रमेश, 

२) प्रणव अशोक भोई


*मिनी गोल्फ:* 


मुले 


१) पाटील महेंद्र दिलीप




*दामोधर नाना क्षमता विकास प्रबोधिनी तर्फे विविध पदांवर निवड झालेले विद्यार्थी*


१) अतुल अनिल पाटील महाराष्ट्र स्टेट फोर्स मध्ये निवड,

 

२) मानस महेश चौधरी अग्निवीर म्हणून निवड, 


३) रोहित रवींद्र तायडे भारतीय सेनेत सैनिक पदावर निवड, 


४) ललित सुरेश महाजन युवा रंग २०२० ललित कला प्रकारात सुवर्णपदक,


५) प्रथमेश पुरुषोत्तम फेगडे राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत निवड,


६) विशाल सुरेश येवले राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत निवड,


७) रोशन ईश्वर सोनवणे, रोहिणी सुनील माळी, जितेन लालू भिलाले या तिघांची बेस्ट युजर्स ऑफ लायब्ररी साठी निवड,


*महाविद्यालयातील विशेष यश संपादक केलेले प्राध्यापक*


१) डॉ पद्माकर ज्ञानदेव पाटील- सीनेट सदस्य पदी निवड,

 

२) डॉ. जी. जी. कोल्हे वाणिज्य विषयाच्या अभ्यास मंडळ सदस्य पदी निवड, 


३) डॉ. कल्पना पाटील उत्तर महाराष्ट्र हिंदी प्राध्यापक परिषद सहसचिव पदी निवड, 


४) डॉ. जगदीश पाटील इंग्रजी अभ्यास मंडळावर सदस्य पदी निवड, 


५) डॉ. जे.जी.खरात इतिहास अभ्यास मंडळावर प्रभारी चेअरमन पदी निवड, 


६) डॉ. जी.एस. मार्तडे शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळावर चेअरमन पदी निवड, 


७) प्रा. उत्पल चौधरी, उर्मी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केल्याबद्दल, डॉ.ए.आय.भंगाळे वाणिज्य अभ्यास मंडळ सदस्य पदी निवड, 


८) डॉ. उदय जगताप पदार्थविज्ञान अभ्यास मंडळात सदस्य पदी निवड, 


९) डॉ. विलास बोरोले प्राणी शास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळ सदस्य पदी निवड, 


१०) राजेंद्र राजपूत एनसीसी चे कॅप्टन पदी निवड, 


११) डॉ. रवी केसुर वाणिज्य अभ्यास मंडळ सदस्य पदी निवड, 


१२) डॉ.  विजय सोनजे जळगाव जिल्हा महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पतपेढी  संचालक पदी निवड, 


१३) पंकज सोनवणे गणित अभ्यास मंडळ सदस्य पदी निवड,

 

१४) डॉ. सागर धनगर ज्ञानज्योती पुरस्कार मिळाल्याबद्दल, 


१५) रमजान गुलाब तडवी आदिवासी साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच डॉक्टर मारोती जाधव, डॉ.ताराचंद सावसाकडे, डॉ.स्नेहल महाजन, डॉ.पल्लवी भंगाळे, प्रा.नाहीदा कुरेशी यांची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पत्रिकेत शोधनिबंध सादर केल्याबद्दल व संपादक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.


*गरीब हुशार व होतकरू विद्यार्थिनी* 


राजश्री अनिल चौधरी, वैशाली विलास महाजन व यशश्री प्रमोद महाजन


*गरीब हुशार बहोतकर विद्यार्थी* 


प्रथमेश पुरुषोत्तम फेगडे 


*प्रिन्सिपल रोल ऑफ ऑनर चे मानकरी*

कनिष्ठ महाविद्यालय: 


पाटील संकेत चंद्रकांत व वायकोळे तेजल रवींद्र


वरिष्ठ महाविद्यालय: 


कला शाखा: बैरागी धीरज रोहिदास

वाणिज्य शाखा: कोळी मोहन भागवत

विज्ञान शाखा: महाजन पुष्पक रमेश


*आदर्श विद्यार्थी पुरस्कार (प्राचार्य जी. जी. तडले पारितोषिक)- 

शिवम चौधरी यांस 


*आदर्श विद्यार्थिनी (कै. सुशिलाबाई तुकाराम चौधरी पारितोषीक) - 

कु. पूजा सोनवणे ला घोषित झाले.


*या सर्व यशस्वीतांना देण्यात आलेली पारितोषिक*


  • कै. शंकर चांगो पाटील पारितोषिक, 
  • कै. मातोश्री पार्वतीबाई शंकर पाटील पारितोषिक, 
  • कै.  उमाताई सिताराम भावे पारितोषिक, 
  • धनाजी नाना महाविद्यालय वैतानिकांची पतपेढी पारितोषिक, 
  • कै. प्रेमचंद इच्छाराम पाटील पारितोषिक, 
  • कै. यशवंत व्यंकटेश चौधरी पारितोषिक, 
  • कै. गोपिकाबाई तुकाराम बोरोले पारितोषिक, 
  • कै. डॉक्टर वामन विठू भारंबे पारितोषिक, 
  • कै. डॉक्टर पि. के. महाजन पारितोषिक, 
  • कै. खेमचंद मिठाराम चौधरी पारितोषिक, 
  • बुधोलाल शंकर शेठ पारितोषिक, 
  • कै. राधाबाई महाजन स्मृती पारितोषिक, 
  • कै.चंद्रभागाबाई विश्वनाथ कासार पारितोषिक,
  • माननीय घनश्याम काशीराम पाटील पारितोषिक, 
  • प्राचार्य डॉक्टर जी. जी. तळेले पारितोषिक, 
  • कै. धोंडू आनंदा फिरके पारितोषिक, 
  • अड. काकासाहेब शिवराम चांगो राणे पारितोषिक, 
  • कै. माधवराव बुदोजी सावसाकडे पारितोषिक, 
  • कै. गिरीजाबाई भावे पारितोषिक, 
  • भास्कराचार्य पारितोषिक, 
  • सौ. केसरबाई बळीराम पाटील पारितोषिक, 
  • कै. कांचन चंद्रकांत पाटील पारितोषिक, 
  • कै. के. टी. चौधरी पारितोषिक, 
  • कै. निशिकांत माधव नेहते पारितोषिक, 
  • श्री. भाऊसाहेब बोंडे पारितोषिक, 
  • श्री. त्र्यंबक दामोदर रायपूरकर पारितोषिक,
  • कै. तुकाराम सोना बोरोले पारितोषिक, 
  • कै. कडू खुशाल पाटील पारितोषिक,
  • कै. धनजी तोताराम पारितोषिक, 
  • कै. केशवराव गोविंद चौधरी पारितोषिक, 
  • कै. वत्सलाबाई शरद राणे स्मृती प्रित्यर्थ डॉक्टर श.रा.राणे पारितोषिक,
  • कै. तोताराम पुणा अत्तरदे पारितोषिक,
  • कै. केशवसुत पारितोषिक, 
  • श्रीमती शांतादेवी गोविंद चौधरी पारितोषिक, 
  • गुरुवर्य प्राध्यापक कालिदास धर्माधिकारी पारितोषिक, 
  • कै. सदाशिव जावळे हिंदी पारितोषिक, 
  • परशुराम सुखा पाचपांडे पारितोषिक, 
  • श्री. निवृत्ती लक्ष्मण चौधरी पारितोषिक, 
  • सौ.नर्मदाबाई प्रल्हाद पाटील पारितोषिक, 
  • कै. सोमा तापीराम राणे पारितोषिक, 
  • कै. भागीरथीबाई सोमा राणे पारितोषिक, 
  • कै. धोंडू आनंदा फिरके पारितोषिक, 
  • श्री.बी.एन.चोपडे पारितोषिक, 
  • श्री. लीलाधर गणेश कोल्हे पारितोषिक, 
  • कै. दगडू सराफ पारितोषिक, 
  • कै. कानजी कौतिक जावडे पारितोषिक,
  • डॉक्टर आर. जे. पटेल पारितोषिक, 
  • स्वर्गीय लोकसेवक मधुकरराव चौधरी पारितोषिक 

इत्यादी पारितोषिक वितरण करण्यात आले.


तसेच तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर, चे अध्यक्ष आमदार शिरीष दादा चौधरी यांची विधानसभेचे तालिका अध्यक्षपदी तसेच महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विकास आयोग पुणे च्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर.चौधरी यांची थायलंड येथील अर्लीकॉन बाल्झर्स कोटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे विद्यारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सत्कार या ठिकाणी करण्यात आला.


प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन स्नेहसंमेलन प्रमुख डॉक्टर राजश्री नेमाडे यांनी केले. 


सूत्रसंचालन डॉ.राजेंद्र राजपूत, प्रा. शुभांगी पाटील, डॉ.एस.एल.बिऱ्हाडे, डॉ.जी.एस.मार्तळे यांनी केले तर आभार धीरज बैरागी या विद्यार्थ्याने मानले. 


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. 



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post