Khandesh Darpan 24x7

काही रेल्वे स्टेशनच्या नावापुढे 'रोड' का लावलं जातं ? खरं कारण काही वेगळंच....

खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -  


रेल्वे प्रवास हा लोकांसाठी आता नित्याचा झाला आहे. अगदी लहान प्रवासापासून ते लांबच्या प्रवासापर्यंत लोक रेल्वेनेच प्रवास करतात. काही स्टेशनच्या नावासमोर रोड असं लिहिलेलं असतं. पण असं का? म्हणजे हा प्रवास तर रेल्वेचा असतो, मग त्या ठिकाणी रोडचा उल्लेख का केला जातो? कधी या गोष्टीचा विचार केलाय? चला यामागचं सविस्तर कारण जाणून घेऊ. 


तुमच्या ट्रेनच्या प्रवासादरम्यान, तुम्ही लोकल किंवा एक्प्रेस ट्रेनच्या स्टेशनच्या नावासमोर 'रोड' प्रत्यय लावला असल्याचं पाहिलं असेल - जसे की 'खार रोड', माटूंगा रोड', 'करी रोड', 'खरियार रोड', 'कपिलास रोड', 'केंद्रपारा रोड', 'खुर्दा रोड' इत्यादी.

यासंबंधीत प्रश्नाचं उत्तर Quora वर भारतीय रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी, अनिमेश कुमार सिन्हा यांनी दिलं आहे. उत्तर देताना म्हणाले, "रेल्वे स्थानकाशी 'रस्ता' शब्दाचा संबंध सूचित करतो की हा रस्ता त्या रेल्वे स्थानकापासून जातो आणि ते ठिकाणी रेल्वे स्थानकापासून थोडं लांब आहे. तसेच प्रवाशांना त्या शहरात जाताना तिथेच उतरावे. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या उत्तरात लिहिले, "रोड नावाच्या स्टेशनपासून त्या ठिकाणापर्यंतचे अंतर 2-3 किमी ते 100 किमी पर्यंत असू शकते."

याचाच अर्थ असा की ज्या स्टेशनच्या समोर रोड लिहिलं असेल, ते ठिकाण या स्टेशनपासून लांब आहे. पण त्या ठिकाणी पोहोचायला तुम्हाला रोड उपलब्ध आहे. ज्याचा वापर करुन तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता. मुख्य वसई ही रेल्वे स्टेशनपासून 2 किमी अंतरावर आहे, कोडाईकनाल हे स्टेशनपासून 79 किमी अंतरावर आहे. सहजारीबाग हे रेल्वे स्टेशनपासून ६६ किमी, रांचीसिटी ही रेल्वे स्टेशनपासून ४९ किमी आहे. म्हणून त्या स्टेशनच्या समोर रोड लिहिलं गेलं आहे.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

Previous Post Next Post