भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुती आयोजित वीर सावरकर गौरव यात्रेचे दिनांक 6 रोजी सावदा शहरात आगमन झाले.
यात्रा श्री दुर्गा माता मंदिर येथून आरंभ होऊन इंदिरा गांधी चौक, संभाजी चौक, गांधी चौक, गवत बाजार, वंजारवाडी मार्गे मोठा आड येथून मार्गस्थ होऊन सोमवार गिरी मढी येथे यात्रेचा समारोप झाला.
प्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद जळगावचे नंदकिशोर महाजन, भाजपा जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर भाऊ महाजन, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, रावेर तालुका अध्यक्ष राजन लासुरकर, तालुका सरचिटणीस महेश चौधरी, डॉ. अतुल सरोदे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, शिवसेनेचे शहर प्रमुख सुरज परदेशी, श्याम अकोले, शहराध्यक्ष जितेंद्र किसन भारंबे, डॉ. चंद्रशेखर पाटील, ॲड. कालिदास ठाकुर, राजेश भंगाळे, प्रतिक भारंबे, विनोद नेमाडे, चेतन नेमाडे, ईश्वर नेमाडे, रितेश पाटील, सागर चौधरी, अतुल चौधरी, जितेंद्र गाजरे, राजेश भंगाळे, गुणवंत वायकोळे, सचिन बऱ्हाटे
शिवसेनेचे मनीष भंगाळे, वेडू लोखंडे, भाजपा सावदा शहर सरचिटणीस महेश अकोले, संतोष परदेशी व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व उपस्थितांचे आभार मानून या गौरव यात्रेचा सावदा शहरात समारोप केला.
إرسال تعليق