Khandesh Darpan 24x7

सावदा ता. रावेर येथे "मन की बात" कार्यक्रमाचे आयोजन




प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान देशातील नागरिकांशी संवाद साधतात.


ऑक्टोबर २०१४ मध्ये सुरू झालेला मन की बात हा कार्यक्रम दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी शंभराव्या भागात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त सावदा येथे भारतीय जनता पार्टी सावदा शहर च्या वतीने मन की बात च्या शंभराव्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण इंदिरा गांधी चौक सावदा येथे करण्यात आले.





मन की बात च्या शंभराव्या भागाने जागतिक स्तरावर विक्रम प्रस्थापित केलेला आहे. त्याची नोंद घेत युनायटेड नेशन्स ने सुद्धा आजच्या कार्यक्रमानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत भारताशी असलेले संबंध दृढ होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादित केले. 


या भागामध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या अनेक युवा उद्योजकांशी वार्तालाप करत त्यांची मते जाणून घेतली. यावेळी मन की बात या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या उद्योग, व्यवसायाचा उल्लेख झाल्याने या उद्योजकांना त्यांच्या उद्योगांमध्ये फायदा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


सदरचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी सावदा शहर च्या वतीने मोठा स्क्रीन व स्पीकर लावून प्रसारित करण्यात आला.





यावेळी सावदा शहर अध्यक्ष जितेंद्र किसन भारंबे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगरसेविका  रंजना भारंबे, बेटी बचाव बेटी पढाव च्या जिल्हा संयोजिका सारिका चव्हाण, अतुल ओवे, राकेश पाटील, महेश बेदरकर, गजानन भार्गव, पंकज बेदरकर, अतुल चौधरी, पोपट पाटील, आकाश, लतेश चौधरी सचिन बऱ्हाटे, सर्वेश लोमटे, तुषार चौधरी, नकुल बेंडाळे, रितेश पाटील, सागर चौधरी, विजय पाटील, ऋषिकेश पाटील, नितीन खारे, अमोल पासे, कोमल चौधरी, भाऊ धांडे, तसेच भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस महेश अकोले तथा संतोष परदेशी यांचे सह परिसरातील नागरिक व्यापारी यांची उपस्थिती होती.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post