प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सावदा विभागात वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत असलेले प्रवीण अशोक साळी यांना १ में महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून जळगाव झोन ऑफिस येथे झालेल्या कार्यक्रमात "गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार" देण्यात आला.
सदरील पुरस्कार मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते व अधीक्षक अभियंता राजेंद्र मार्के यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आला.
सदरील पुरस्कार सोहळा कार्यक्रमाला कामगार कल्याण अधिकारी खेडकर, आयुर्वेदिक आहार तज्ञ, डॉ. नीता पाटील, मोटिव्हेशनल स्पीकर राकिब अहमद यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे, नंदुरबार व जळगाव सर्कल मधील एकूण ६२ कामगारांना देण्यात आला.
प्रवीण साळी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सावदा व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post a Comment