मित्रांनो आपल्यातील अनेकांना रोज ड्रिंक करण्याची सवय असते. कोणाला वाइन प्यायची सवय तर कोणाला साधा लेमन ज्यूस पिण्याची सवय असते तर काही लोकं देशी दारू पीत असतात. तर काही लोकांना वाटते की बिअर आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. पण, जर तुम्हाला असे वाटत असेल तर ते चुकीचे असेल. कारण बिअर पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण आपण रोज किती प्रमाणात बिअर प्यायली पाहिजे हे बहुतेकांना माहीत नसते.
बिअर पिण्याने काही फायदा होऊ शकतो, ही गोष्ट काही लोक मान्य करणार नाहीत, हे मी समजू शकतो. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, मर्यादित प्रमाणात कोणी बिअरचे सेवन करत असेल तर त्याला त्याचे फायदे मिळू शकतात. ही गोष्ट रिसर्चमध्ये देखील सिद्ध झालेली आहे. तर जाणून घेऊयात संतुलित प्रमाणात बिअर पिण्याचे फायदे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण देखील कमी आहे आणि ते इतर मादक पेयांपेक्षा कमी हानिकारक मानले जाते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बिअर प्यायल्याने अनेक गंभीर आजारांचा धोकाही दूर होतो.
मुतखडा –
मित्रांनो मुतखडा यावर रामबाण उपाय म्हणून बिअर पिली जाते. पुष्कळ लोक म्हणतात की जर तुम्हाला मुतखड्यापासून लवकरात लवकर सुटका हवी असेल तर तुम्ही बिअरचे सेवन करू शकता. बिअर प्यायल्याने स्टोन फुटतो आणि लघवीद्वारे बाहेर पडतो. म्हणूनच अनेक लोक किडनी स्टोन झाल्यानंतर बिअर पिण्याची शिफारस करतात.
तणाव दूर करण्यासाठी –
रोजच्या जीवनातील त्रासाला कंटाळून लोक तान दूर करण्यासाठी देखील बिअर सेवन करत असतात. मित्रांनो अल्कोहोल हे आरोग्याच्या बाबतीत हानिकारक असते पण बिअरबाबतच्या अनेक संशोधनांमध्ये ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला आहे. जर तुम्ही बिअरचे सेवन मर्यादित प्रमाणात केले तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे पाहायला मिळतील. काही संशोधनात असे म्हटले आहे की बिअर पिल्याने तणाव, चिंता आणि थकवा या समस्या दूर होतात. परंतु बिअर 350 मिलीग्रामपेक्षा जास्त घेऊ नये.
अल्सर-
म्हणजेच पोटातील आतड्यांच्या समस्या पासून आराम देते – मित्रांनो काही संशोधनांमध्ये असे सांगण्यात आले आहे की 75 मिलीग्राम बिअरचे सेवन केल्याने अल्सरच्या समस्येत खूप आराम मिळतो. पण बिअर फक्त मर्यादित प्रमाणातच प्यायली पाहिजे, त्याचे जास्त सेवन करणे तुमच्या शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते.
विचारशक्ती वाढवते –
बिअर पिल्याने मेंदूची पॉवर वाढते असे म्हटले जाते. विचार करण्याची क्षमता सुधारते. यामुळे मेंदूतील अडथळ्यांची समस्या दूर होते. संतुलित प्रमाणात बिअरच्या सेवनाने मेंदूतील ऑक्सिजनची पातळी योग्य राहते. पण अधिक प्रमाणात बिअरचे सेवन केल्यास त्याच्या मेंदूवर निगेटिव्ह परिणामही पडतो.
हाडे मजबूत होतात –
बियर पिल्याने आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात. हाडांच्या विकासात सिलिकॉनची भूमिका महत्त्वाची असते. यासाठी एका नियमित अंतराने ड्रिंक पिल्याने आर्थोसिलिसक ऍसिड तयार होते. यामध्ये हाडांचे रोग होण्याचा धोका कमी होतो. यामुळे आस्टियोपोरोसिस म्हणजेच हाडांच्या पोकळपणाच्या आजारातही फायदा होतो.
Post a Comment