प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या इयत्ता १२ वी च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी २ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहिर झाला सावदा शहरातील पालिका संचालित श्री आ.गं.हायस्कुल व ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल लागला असून निकाल खालील प्रमाणे -
१२ वी विज्ञान --
प्रथम क्रमांक -- सानिका प्रविण चौधरी -- एकूण गुण ४७२ (७८.६७ टक्के)
द्वितीय क्रमांक -- भुषण राजेश वाणी --- एकूण गुण ४६९ (७८.१७ टक्के)
१२ वी कला --
प्रथम क्रमांक -- निशा समाधान तायडे -- एकूण गुण ३८१ (६३.५० टक्के)
द्वितीय क्रमांक -- ज्योत्स्ना भागवत कोळी -- एकूण गुण ३६६ (६१.०० टक्के)
बारावी विज्ञान शाखेत एकूण ९८ विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ९८.९७ टक्के लागला.
बारावी कला शाखेत एकूण १०७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले या कला शाखेचा निकाल ५९. ८१ टक्के लागला
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी गटनेते, माजी नगरसेवक, प्रशासन अधिकारी कैलास कडलग मुख्याधिकारी किशोर चव्हाण, मुख्याध्यापक सी.सी. सपकाळे, पर्यवेक्षक जे. व्हि. तायडे, व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment