Khandesh Darpan 24x7

प्रेशियस कॉम्प्युटर्स सावदा तर्फे संगणक साक्षरता अभियान प्रवेश पूर्व परीक्षा संपन्न...



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 

सावदा येथील 1999 पासून संगणक क्षेत्रात कार्यरत असलेले कुळकर्णी सरांचे प्रेशियस कॉम्प्युटर्स, व डिजिटल वर्ल्ड  इज्युकेशन प्रा. लि. च्या सरकारमान्य अधिकृत प्रशिक्षण केंद्र तर्फे नोकरीसाठी आवश्यक कम्प्युटर कोर्स CCC, D.C.A., D.C.ed या संगणक अभ्यासक्रमा करिता प्रवेशपूर्व परीक्षा (Entrance Exam) सावदा येथील श्री. आ.गं. हायस्कूल व श्री. नामदेव गोमाजी पाटील उदळीकर कनिष्ठ महाविद्यालय येथे दि. २८ रोज रविवार रोजी घेण्यात आली. परीक्षेमध्ये जनरल नॉलेज, इंग्रजी व गणित हे विषय देण्यात आले होत. ५ वी ते ७ वी, ८ वी ते १० वी व ११ वी पासून पुढील सर्व असे ३ गट पाडण्यात आले होते. परीक्षेसाठी एकूण 400 ते 500 मुला-मुलीनी नी सहभाग घेतला होता.  


परीक्षा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी प्रेशियस कॉम्प्युटर्स चे संचालक प्रदिप कुळकर्णी, संदीप कुळकर्णी, सहाय्यक राज चौधरी (सर), मंजुषा पाटील, रुचिका पाटील तसेच डिजिटल वर्ल्ड एज्युकेशन प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश ढवळे, शैक्षणिक विकास अधिकारी रमेश शेवाळे, गट अधिकारी नितीन जाधव, शैक्षणिक सल्लागार देवानंद वाघ, धनंजय वाकोडे यांनी सहकार्य केले तर परीक्षेसाठी सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण व श्री. आ.गं. हायस्कूल व श्री. नामदेव गोमाजी पाटील उदळीकर कनिष्ठ महाविद्यालय चे मुख्याध्यापक सी.सी. सपकाळे सर व यांनी शाळेतील रूम उपलब्ध करून दिल्या...

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

Previous Post Next Post