Khandesh Darpan 24x7

व्यसनांपासून दूर असणारे सेवाभावी अशोकराव कोलते पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त



प्रतिनिधी :  युवराज  चौधरी  |  राजेश चौधरी  


सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक अशोकराव दिगंबर कोलते मुळगाव लहान वघोदा ता. रावेर ह. मु. पिंप्राळा जळगाव. हे नुकतेच पोलीस जिल्हा नियंत्रण कक्ष येथुन दि. ३१ मे २०२३ रोजी ४० वर्ष प्रदीर्घ सेवा ईमाने ऐतबारे बजावून सेवानिवृत्त झाले.

 

कामाच्या ठिकाणी स्टाफ तर्फे त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. असे असले तरी आपले जवळचे  मित्रपरिवार आप्तेष्ट नातेवाईक यांच्या समवेत सुद्धा सत्कार व्हावा अशी परिवाराची इच्छा होती त्या अनुषंगाने ०६  मे २००३ रोजी भव्य सेवापुर्ती सोहळा त्यांचे  निवासस्थानी विद्यानगर येथे दिमाखात संपन्न झाला. 




प्रथम त्यांच्या अर्धांगिनी सौ आशिका अशोक कोलते यांनी सत्कार मूर्तीचे औक्षण केले. दोघं उभयतांनी वडील सेवानिवृत्त हवलदार दिगंबर देवाचजी कोलते यांचे चरण स्पर्श करून शुभ आशीर्वाद घेतले वडिलांनी हा देखणा सोहळा आपल्या डोळ्यांमध्ये साठवला. त्यांची छाती अभिमानाने फुलून आली होती. 



पोलीस सहकारी अधिकारी व अंमलदार मित्र, बंधू-भगिनी, नातेवाईक, मित्रपरिवार यांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक धनवडे साहेब यांनी सांगितले की 'आपले कार्यक्षेत्र हेच तीर्थक्षेत्र मानणार व्यक्तिमत्त्व' म्हणजे  अशोक कोलते होय. याप्रसंगी त्यांच्या प्रथम नियुक्ती ठिकाणी सोबत असलेले सहकारी  महाराष्ट्र राज्य प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष तथा राज्य शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त चंद्रकांत जनार्दन चौधरी यांनी सत्कार मूर्ती बद्दल आठवणी प्रकट केल्या. ते म्हणाले आमच्या सोबत अशोक कोलते हे वयाने लहान होते पण आता ते त्यांच्या कार्या कर्तुत्वाने मोठे आहे. सेवेत असताना त्यांनी व्यसनमुक्त व निष्कलंक असे प्रदीर्घ चाळीस वर्षे सेवा कार्य केले याबाबत मला अभिमान आहे. त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले उर्वरित आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. 



योग शिक्षिका माधुरी पाटील यांनीही मनोगत व्यक्त करताना त्यांच्या कामाची पद्धत, शिस्त, देशभक्ती त्यांनी स्वभाव गुणांचा आधार घेत मनोगत ठेवले शुभेच्छा दिल्या. कार्यालयीन ए.एस.आय बंधू प्रकाश पाटील यांनी कोलते यांनी प्रदीर्घ ४० वर्षाच्या सेवेत माणसे जोडली आपल्या कामावर असलेली त्यांची श्रद्धा तत्परता, अलीकडे काळात धावपळीचे जीवन, वाढती गुन्हेगारी, कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस बांधवांना मोठा समन्वय ठेवावा लागतो त्यासाठी त्यांनी भरीव कार्य केले आहे. व्यसनमुक्त सेवा कार्य करून त्यांनी एक आदर्श ठेवला आहे. असे प्रतिपादन केले. 


याप्रसंगी अशोक चौधरी, दिलीप झांबरे, गणेश पाटील, राजेंद्र चौधरी, मधुकर चौधरी माजी सैनिक, पुढील सर्व पी.एस.आय.बांधव कैलास चौधरी, शिवलाल गालफाडे, सुभाष चिंतामण पाटील, राम महाजन, सुनील जोशी यांचे सह स्टाफ उपस्थित होता.



या गौरव सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रम प्रसंगी लहान बंधू संजय कोलते, प्रवीण कोलते, चिरंजीव मनोज कोलते, धीरज कोलते, सुना सौ. मनीषा कोलते, सौ. रूपाली कोलते यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. नातवंडे बालगोपाल यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. 


कार्यक्रमाचे  प्रास्ताविक सूत्रसंचालन युवराज कुरकुरे सर यांनी केले.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा








Post a Comment

Previous Post Next Post