प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील क्रीडा विभागा तर्फे ऑनलाईन योग दिवस साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रम अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर व प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य डॉ. अनिल भंगाळे सर, डाॅ. विलास बोरोले सर, डाॅ. उदय जगताप सर, डाॅ. शंकर जाधव सर, प्रा. दिलीप तायडे सर हे उपस्थितीत होते. सदरील कार्यक्रमास ५६ व्यक्तींची उपस्थिती होती.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करतांना आयुष्यात योगाचे महत्त्व काय?, हे सांगितले. तसेच योग दिवस फक्त एक दिवस साजरा नकरता प्रत्येक व्यक्तीने दैनंदिन जीवनात आंगिकार करून नियमीत सराव करण्याची गरज असल्याचे सांगितले. योग दिना निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मुख्य मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डाॅ. गोविंद मारतळे यांनी सर्वाग सुंदर व्यायाम, उभ्या स्थितीतील आसन, बैठ्या स्थितीतील आसन, पाठीवर झोपून करावयाचे आसन, पोटावर झोपून करावयाचे आसन, प्राणायाम आणि ध्यान यांचे प्रात्यक्षिक दाखवून सराव करून घेण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर, सर्व उपप्राचार्य तसेच जीमखाना समितीचे सर्व सदस्य व राजेंद्र ठाकुर आणि विद्यार्थी मित्राचे अनमोल असे सहकार्य लाभले.
Post a Comment