प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा येथून २०० लाभार्थी जळगाव कडे रवाना.
'शासन आपल्या दारी' अभियानाचा जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज २७ जून रोजी पोलीस कवायत मैदान जळगाव येथे होणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सावदा येथील शासकीय विश्राम गृह येथे सकाळी ८ वाजे पासून शासन आपल्या दारी कार्यक्रमाची नियोजनबद्ध तयारी सावदा चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांचे मार्गदर्शना खाली -
प्रशासकीय अधिकारी सचिन चोळके, लेखापाल विशाल पाटील, लेखा परीक्षक भारती पाटील, शहर समन्वयक अरुणा चौधरी, पाणीपुरवठा अभियंता जितेश पाटील, तंत्रज्ञ अविनाश पाटील, स्थापत्य अभियंता अविनाश गवळे, लिपिक मनोज चौधरी, हमीद तडवी, आकाश तायडे, संगणक तंत्रज्ञ धीरज बनसोडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, समुदाय संघटक महेश इंगळे, वरिष्ठ लिपिक सतीश पाटील, रोखपाल विमलेश जैन, पी.एम.ए.वाय.ए.- विनय खक्के, शिपाई कर्मचारी विजय चौधरी, संदीप वाणी, तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी तथा सफाई कर्मचारी यांनी केली होती.
सावदा येथून रावेर आगाराच्या ३ बसेस तसेच काही खाजगी वाहने, रावेर तालुक्यातून एकूण २० बसेस जळगाव येथे रवाना करण्यात आली.
सावदा येथून सुमारे २०० लाभार्थी यांनी लाभ घेतला आहे. रावेर तालुक्यातून एकूण २५०० लाभार्थी यांनी लाभ घेतला आहे. यावेळी प्रत्येकास फूड पॅकेट, पाणी जार, चहा चे ग्लास, गार्बेज बॅग अशी वाटप करण्यात आली.
शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत जवळपास २०० लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्याची माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनाचा लाभ देण्यात येत आहे.
नगर पालिका क्षेत्रात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना स्वतःचे पक्के घर नाही अशा नागरिकांसाठी पक्के घर बांधकाम करण्यासाठी रमाई आवास योजना (शहरी) राबविण्यात येत आहे. यांचे अनुदान टप्या-टप्यात देऊन त्यांना पक्के घर बांधण्यास सहाय्य करण्यात येते.
शासन आपल्या दारी’ अभियानाची वैशिष्ट्ये –
➡️राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. या उपक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
➡️ जिल्हाधिकारी या अभियानाचे जिल्हा प्रमुख असतील व इतर सर्व विभाग हे त्यांच्या समन्वयाने काम करतील. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येणार आहे.
➡️ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्याचे ध्येय सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवावे. प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर / तालुकास्तरावर २ दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
➡️ मंत्रालयीन स्तरावरील सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेऊन या उपक्रमांतर्गत राबवायच्या योजनांचे जिल्हानिहाय उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदारांनी शिबिराचे नियोजन केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी विविध सरकारी यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून नागरिकांना सेवा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या दृष्टीने यंत्रणांनी विविध योजनांचा लाभ देण्यासाठी नागरिकांनाकडून अर्जही भरून घेतले.
काही ठिकाणी सभागृहात, तर काही ठिकाणी मंडप उभारून विविध यंत्रणांचा कक्ष स्थापन करण्यात आला होता. शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, जलसंपदा, पशुसंवर्धन, पंचायत समिती, निवडणूक शाखा, भूमी अभिलेख, सामाजिक वनीकरण आदी विभागांनी सहभाग घेतला होता.
Post a Comment