Khandesh Darpan 24x7

पर्यावरण संरक्षण संवर्धन संस्था सदस्यांची पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रास भेट



प्रतिनिधी :  युवराज  चौधरी  |  राजेश चौधरी  


जागतिक पर्यावरण दिन विशेष निमित्त अर्थव्यवस्थेत वाढत्या प्रगत लोकसंख्येच्या वाढत्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी थर्मल पावर स्टेशन वीज निर्मिती साठी महत्वाची भूमिका ठेवतात. 



त्याचे जाळे भुसावळ तालुक्यात फेकरी, दीपनगर, पिंपरीसेकंम प्रकल्पाच्या माध्यमातून तयार झालेले दिसून येते, निश्चितच प्रदूषण मानांकाचा अभ्यास करून पर्यावरण संवर्धन कसे करता येईल यासाठी स्थापन केलेल्या पर्यावरण संरक्षण संवर्धन संस्था. फुलगाव, ता. भुसावळ ५५०/०२ या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात वीज कशी तयार होते? असा विचार करून माहिती घेण्यासाठी पूर्व परवानगी घेत ०४ जून रोजी प्रकल्पाला भेट दिली. 




प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता अतुल बऱ्हाटे यांनी तन-मन-धनाने अभ्यास पूर्ण सखोल माहिती दिली. वीज निर्मितीचे विविध टप्पे याबाबत त्यांनी प्रत्यक्ष प्रकल्प ठिकाणी माहिती दिली. प्रदूषणाची मानांकने पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रो स्टॅटीक प्रेसिपीटेटर (ई.एस.पी) यंत्रणा कशी उपयुक्त ठरते. व औष्णिक विद्युत केंद्र यांना प्रदूषणावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते.


या यंत्रणेमुळे हे प्रकल्प वीज निर्मिती साठी संजीवनी ठरत आहे. पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याची बचत कशी केली जाते? याबाबत मत कनिष्ठ अभियंता अतुल बऱ्हाटे यांनी व्यक्त केले. 


याप्रसंगी पर्यावरण संरक्षण संवर्धन संस्था अध्यक्ष माजी पंचायत समिती सभापती तथा जि.प.सदस्य राजेंद्रभाऊ साहेबराव चौधरी, पर्यावरण तज्ञ प्राध्यापक के.पी.चौधरी सर खजिनदार युवराज कुरकुरे सर, अविनाश शालिग्राम देशमुख सर,संजय लक्ष्मण पाटील, स्वप्निल राजेंद्र चौधरी यांनी जिज्ञासू वृत्तीने माहिती जाणून घेतली. वैज्ञानिक व उपयुक्त माहिती मिळवून संस्थेचे सर्व सदस्य भारावून गेले. या नावीन्यपूर्ण भेटीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 



पर्यावरण तज्ञ के. पी. चौधरी यांनी विविध प्रश्न विचारून अधिक माहिती जाणून घेतली. प्रकल्पाची उर्वरित माहिती पुढील टप्प्यात संस्थेचे उर्वरित सदस्य व पर्यावरण प्रेमी समवेत घेण्यात येईल असे मत संस्थेचे अध्यक्ष  राजेंद्रभाऊ चौधरी यांनी सांगितले.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा








Post a Comment

Previous Post Next Post