Khandesh Darpan 24x7

प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी व प्रा. डॉ.विजय सोनजे यांना राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्कार


प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशियाल डेव्हलपमेन्ट गुरुकुल फाऊंडेशन, धुळे या संस्थे तर्फे, धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर चे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, व प्राध्यापक डॉ. विजय सोनजे यांना राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्कार देवून दोहांच्या कार्याचा  गौरव करण्यात आला. दिनांक. 4/06/2023 रोजी नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे आयोजित राष्ट्रीय राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद व रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशियाल डेव्हलपमेन्ट गुरुकुल फाऊंडेशन, धुळे यांच्या तर्फे  भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे : यश आणि अपयश या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.




पुरस्कारासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली होती त्या समिती चे चेअरमन प्राचार्य. डॉ. मनोहर पाटील, एस. एस. व्ही.पी.एस. कॉलेज धुळे, यांनी व त्यांच्या अखिल भारतीय स्तरावर नेमलेल्या समितीतील सदस्यांमार्फत पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्यात आली. दिनांक 4/06/2023 रोजी नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे मोठ्या थाटात या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी व डॉ. विजय सोनजे या एकाच महाविद्यालयातील दोन व्यक्तींना पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.



प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांनी शैक्षिणक क्षेत्रात, विद्यापीठाच्या प्राधिकरणात व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता, प्राध्याक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, केंद्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कार्यकारणीत मोठ्या पदावर काम करत असताना न्याय हक्कासाठी मोठी कामगिरी केली आहे, तसेच डॉ. विजय सोनजे हे ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विविध राष्ट्रीय अंतराष्ट्रीय स्तरावर शोध लेखन, ब्लॉग लेखन, संपादन, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात व न्याय हक्कासाठी लढणाऱ्या संघटनाच्या माध्यमातून सक्रिय असतात.




प्राचार्य चौधरी यांना अनुभवी व तज्ञ म्हणून तर डॉ.विजय सोनजे यांना नवीन नेतृत्व म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला अश्या प्रकारे त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरी मुळे त्यांचा सन्मान म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 


प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांनी या पुरस्काराचे श्रेय महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी, संघटनेचे कार्यकर्ते सहकारी प्राध्यापक व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांना दिले असून डॉ. विजय सोनजे यांनी ही संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी यांच्या सोबतच त्यांचे या क्षेतत्रातील  प्रेरणास्थान राहिलेले प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांना दिले आहे व त्यांच्या प्रेरणेने सतत समाज उपयोगी कार्य करत राहील असे सांगितले.

 


प्रसंगी मंचावर नांदेड येथील ख्यातनाम संशोधक डॉ. सूर्यकांत पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपस्थित होते तसेच निवड समिती प्रमुख प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, कार्याध्यक्ष डॉ. प्रमोद पवार, प्रमुख अतिथी डॉ. दिलीप रामू पाटील,  व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. महेंद्रसिंग रघुवंशी, सिनेट सदस्य डॉ. एस. टी.पाटील, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन नांद्रे, तसेच डॉ. संभाजी पाटील, डॉ. एल. पी. देशमुख, पंजाब प्रांत समितीचे अध्यक्ष डॉ. गुरुप्रित सिंह, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. आर. आर. अहिरे, डॉ. प्रवीण मोरे, डॉ. दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 


मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी व संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, परिसरातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.





अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा








Post a Comment

Previous Post Next Post