Khandesh Darpan 24x7

"शासन आपल्या दारी" अभियान अंतर्गत सावद्यात विविध दाखले मिळण्यासाठी शिबिर 



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी या योजनेतून इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॅशनॅलिटी दाखला, डोमेसाईल दाखला, इत्यादी दाखले विशेष शिबिरात काढले जातील. हे शिबीर दि ०६ जून २०२३ रोज मंगळवार सकाळी १०.४० पासून सावदा येथील नगरपालिका संचलित श्री आ. गं. हायस्कुल मध्ये आयोजित केले आहे. तरी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा.



ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींना  दाखले काढायचे असतील त्यांनी वरील शिबिरात वेळेवर शाळेत उपस्थित रहावे.


वरील दाखले काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे लागतील-


१) विदयार्थी आणि वडील यांचे आधार कार्ड, 

२) विद्यार्थी, वडील, आजोबा यांचे लिविंग सर्टिफिकेट,  

३) रेशन कार्ड,  

४) नॉन क्रिमि्लेयर साठी ३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, वडील नोकरीत असेल तर आयकर रिटर्न, 

५) विद्यार्थी आणि वडील यांचे पासपोर्ट फोटो 


वरील सर्व कागदपत्रे ओरिजिनल आणावेत.



शासन आपल्या दारी  या शिबिरात आपण खालील प्रमाणपत्र देणार आहोत :-


१) उत्पन्न दाखला (तहसीलदार यांचा)

२) उत्पन्न अहवाल (तलाठी)

३) अधिवास प्रमाणपत्र (डोमीसाईल) 

४) नॉन क्रिमिलेयर दाखला 

५) राष्ट्रीयता प्रमाणपत्र (नॅशनलिटी) 

६) जातीचा दाखला 

७) केंद्राचा जातीचा दाखला

अधिवास प्रमाणपत्र व राष्ट्रीयता प्रमाणपत्रासाठी जन्म दाखला, राशन कार्ड, आधार कार्ड ही कागदपत्रे लागतील.


तरी या शिबिराचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त  घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक सी. सी. सपकाळे यानी केले आहे.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा








Post a Comment

Previous Post Next Post