खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
मधुमेही रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याची फार काळजी घ्यावी लागते. या रूग्णांना आहाराच्या बाबतीत फार पथ्य पाळावी लागतात. अशातच आज आम्ही तुम्हाला तुमच्या वयोमानानुसार ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे, याची माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या वयानुसार, तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण किती असलं पाहिजे.
वयानुसार किती असली पाहिजे ब्लड शुगर ( Blood sugar )
- 18 वर्षांवरील लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी ( Blood sugar ) जेवणाच्या एक किंवा दोन तासांनंतर 140 मिलीग्राम असते. मात्र जर तुम्ही उपवास केला असेल तर ती 99 मिलीग्राम प्रति डेसीलीटर असावे.
- 40 वयोगट किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनी नियमित आरोग्य तपासणी केली पाहिजे. ज्या व्यक्तींचं वय 40 ते 50 च्या वयोगटात आहे आणि ते डाबयेटीजचे रूग्ण आहे, त्यांची फास्टिंग शुगर लेव्हल ( Blood sugar ) 90 ते 130 mg/dL असली पाहिजे.
- तर याच वयोगटातील व्यक्तींची शुगर लेवल जेवल्यानंतर 140 mg/dl आणि रात्रीच्या जेवणानंतर 150 पेक्षा कमी असणं चांगलं मानलं जातं. मात्र जर शुगर लेवल यापेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.
- 50 ते 60 या वयोगाटातील व्यक्तींची ब्लड शुगल लेवल ही फास्टींगवेळी 90 ते 130 mg/dL पेक्षा कमी आणि दुपारच्या जेवणानंतर 140 mg/dl पेक्षा कमी असावी. तर दुसरीकडे रात्रीच्या जेवणानंतर ही रेंज 150 mg/dl पर्यंत असावी.
Disclaimer : वर देण्यात आलेल्या गोष्टी केवळ सामान्य माहिती प्रदान करतात. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. खान्देश दर्पण 24x7 या गोष्टींची पुष्टी करत नाही.
Post a Comment