सावदा ता. रावेर येथील मुस्लिम समाज बांधव जातीय सलोख्यासाठी एक पाऊल पुढे सरसावले आहे. बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
सविस्तर असे कि, गुरुवार दिनांक २९ रोजी हिंदू व मुस्लिम बांधवांचे पवित्र सण एकाच दिवशी येत असल्याने हिंदू बांधवांची आषाढी एकादशी हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी भगवंताचा पूर्ण वातावरणात मोठा उत्साह मानला जाणारा सण व त्याच दिवशी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद मोठा सण येत असून हिंदू मुस्लिम धर्मात जातीय सलोखा सावदा शहरात कायम टिकून रहावा यासाठी आषाढी एकादशी निमित्त बकरी ईद हा सण येत असला तरी या दिवशी मुस्लिम समाज कोणतीही कुर्बानी न देता हिंदू बांधवांसाठी हा सण उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. असे पत्रक त्यांनी आज प्रसिद्ध केले आहे.
शहरातील विविध भागांतील मुस्लीम समाज बांधवांमध्ये चर्चा करून २९/०६/२०२३ रोजी मुस्लीम समाजाचा बकरी ईद सण साजरा करण्यात येणार असून त्याच दिवशी हिंदु समाजाचा आषाढी एकादशी हा सण येत आहे व हे दोन्ही सण दोन्ही धर्मीयांसाठी पवीत्र असल्याने सावदा शहरात हिंदू मुस्लीम सामाजिक एकोपा व एकता टिकुन राहावी.
शहरात बंधुभाव टिकून रहावे सामाजीक ऐक्य आबाधीत ठेवण्यासाठी मदत या उद्देशाने सावदा शहरातील मुस्लीम समाज बांधवांनी हिंदु बांधवांच्या आषाढी एकादशी या सणाच्या धार्मीक भावनेचा आदर करून बकरी ईद निमीत्त दिनांक २९/०६/२०२३ गुरुवार या दिवशी कोणत्याही प्रकारची कुर्बानी करणार नाही तसेच त्याऐवजी शुक्रवार व शनिवार या दिवशी कुर्बानी करण्यात येईल असा निर्णय घेतला.
मुस्लिम समाजानेलोकभावनेतुन सर्व धर्मीयांनी एकमेकांना अशाच प्रकारचे सहकार्य करून राष्ट्रीय एकात्मता वाढीस समाजात एक जन संदेश देण्याचा प्रयत्न मुस्लिम समाजाने घेतला.
या पत्रकावर -
जामा मशीद चे ट्रस्टी - अमजद खान अमान खान,
नगीना मशीद चे ट्रस्टी - शेख अख्तर शेख रहेमान,
गौसिया मशीद चे ट्रस्टी - शेख आरिफ शेख करीम,
मदिना मशीद चे ट्रस्टी - शेख अजित शेख रशीद मोमीन,
ताजुशरीया मशीद चे ट्रस्टी - शेख कादिर शेख युसुफ,
माजी नगरसेवक - फिरोज खान हबीबऊल्ला खान,
बाजार समिती संचालक - सय्यद अजगर सय्यद तुकडू,
सय्यद खलील सय्यद नुरा, शेख मुस्ताक शेख खलील, शेख कलीम शेख जलीस या मुस्लिम बांधवांच्या सह्या आहे.
मुस्लिम समाजाच्या या स्तुत्य निर्णयाचे पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व आरोग्य प्रमुख सचिन चोळके व हिंदू बांधवांनी स्वागत केले आहे.
खूप छान असा मेकअप केलेलं असतो बातमीचा त्यामुळे बातमी लगेच कळते.
ردحذفإرسال تعليق