Khandesh Darpan 24x7

करा योगा आणि निरोगी जगा - महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज


शांत मनाची गुरुकिल्ली म्हणजे योगा....

करा योगा आणि निरोगी जगा - महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज


प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 





दैनंदिन कर्म करीत असताना मनुष्याचे शरीर स्वास्थ चांगलं असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपली रोग प्रतिकार शक्ती योग्य असावी आणि या सर्व गोष्टींच्या नियंत्रणासाठी नियमित योगा करणे महत्त्वाचे आहे असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून श्री सतपंथ चारिटेबल ट्रस्ट संचलित निष्कलंक धाम, वढोदा येथे आयोजित योग शिबिरात सांगितले.



दिनांक २१ जून रोजी सकाळी सहा ते आठ दरम्यान सर्वांसाठी निःशुल्क घेण्यात आलेल्या या योग शिबिरात आचार्य सचिन जी यांनी अत्यंत साध्या, सोप्या व नियमित करण्यायोग्य असे योगासने उपस्थितांना शिकविली. 



भव्य व्यासपीठावर परमपूज्य जनार्दन हरी जी महाराज यांनीही योगासने केली. यात उभे राहून, बसून आणि झोपून करावयाची योगासने अनुक्रमे ताडासन, तिरियक आसन, कटी चक्रासन नौकासन, फुलपाखरू आसन, भुजंगासन, सिंहासन, भस्त्रिका प्राणायाम, कुंभक, अनुलोम विलोम आदी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. 



या योग शिबिराला महाराष्ट्रातून ३०० स्त्री, पुरुष, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रवीण भाई पटेल यांच्या हस्ते भव्य अशा लॉनचे उद्घाटन करण्यात आले. 

निष्कलंक धाम हे मनोरंजनाची जागा नसून जिवंत माणूसच भगवान आहे आणि त्याच्या शरीर स्वास्थ्य व मनःशांतीसाठी असलेला हा भव्य प्रकल्प आहे. या ठिकाणी माझे हेच मंदिर असून हीच पूजा व साधना आहे असे महाराजांनी यावेळी सांगितले. 


येत्या काही दिवसात पाच दिवसाचे प्राकृतिक चिकित्सा शिबिर घेण्यासाठी नाव नोंदणी करण्यात आली. या योग शिबिराला आचार्य सचिनजी सोबत विकास पाटील, डिगा पांडुले, सदाशिव पांडुले, सुरेश निराले, अनिकेत अलावे, सतपंथ चारिटेबल ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी अनमोल सहकार्य केले.




अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

Previous Post Next Post