प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात शयनी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्रात, हा सण आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो आणि तो प्रसिद्ध पंढरपूर वारीशी संबंधित आहे, जो भगवान विठोबा (भगवान विष्णूचे एक रूप) यांना समर्पित असलेल्या पंढरपूर शहरातील तीर्थक्षेत्र आहे. असा हा पवित्र सणाचा उत्साह काय वर्णावा....
महाराष्ट्रातील वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करत पंढरीत जात असतात. अशातच सावदा येथील श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील कन्या विद्यालयात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली गेली.
यावेळी विद्यालयात प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणी भासावी अशी वेश भूषा करून आणि वारकऱ्यांच्या वेशभूषा करून विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. रिंगण, भजन करीत संपूर्ण विद्यालय आणि विद्यार्थिनी विठ्ठल नामात लीन झाले होते. यावेळी शहरातून वारकऱ्यांच्या वेशेत दिंडी काढण्यात आली.
विठ्ठलाच्या वेशभूषेत विद्यालयाची विद्यार्थिनी कु.इशिका ठोसरे ही होती तर रुक्मिणी च्या वेशात नुपूर चांदेलकर ही विद्यार्थिनी होती. अशा तऱ्हेने मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी केली गेली. या वेळी सावद्या चे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी विद्यार्थिनीचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे, पर्यवेक्षक पी. जी. भालेराव, आणि सर्व शिक्षक शिक्षिका तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Attractive Formatting
ردحذفखूपच सुंदर असे सृंगार केलेलं असत
ردحذفअगदी खर आहे
حذفखूप सुंदर बातमी आणि आकर्षक मांडणी त्यासाठी तुम्हा दोघांच्या अभिनंदन..
ردحذفधन्यवाद सर
حذفإرسال تعليق