प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा शहरात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली होती, पाऊस इतका जोरात होता की शहरातील काही भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली असता मुक्ताईनगर मतदार संघांचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ रावेर तहसीलदार बंडू कापसे यांना नुकसानग्रस्त भागात मदत व पंचनामे करण्याचे आदेश दिले.
तात्काळ आदेश मिळताच रावेर येथील तहसीलदार श्री बंडू कापसे यांनी सावदा येथे पुरजन्य परिस्थितीची पाहणी केली. यावेळी सावदा शहराचे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी किशोर चौव्हान, माजी नगरसेवक फिरोज खान, शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी, माजी नगरसेवक शाम अकोले, माजी नगरसेवक अजय भारंबे, कुशल जावळे, मंडळ अधिकारी वानखेडे, तलाठी शरद पाटील आदी उपस्थित होते.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा
Post a Comment