Khandesh Darpan 24x7

विद्यार्थ्यांना लवकर करियर सुरू करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भरीव कार्य करीत आहे: प्रा. विजय चौधरी



प्रतिनिधी :  युवराज  चौधरी  |  राजेश चौधरी  


विद्यार्थ्यांना लवकर करियर सुरू करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भरीव कार्य करीत आहे: प्रा. विजय चौधरी यांनी ( शिल्पनिर्देशक आर. ए. सी.) सेवानिवृत्ती प्रसंगी मत व्यक्त केले





यावल येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे शिल्पनिर्देशक आर ए सी म्हणून कार्य करीत असलेले विजय पंढरीनाथ चौधरी सर मुळगाव  अट्रावल ह. मु. भुसावळ हे ३० जून रोजी प्रदीर्घ ३६ वर्ष सेवा इमाने इतबारे पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. 


शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यावल सर्व स्टाफ आणि प्रशिक्षणार्थींच्या वतीने प्रदीर्घ सेवापुर्ती सोहळ्यानिमित्त त्यांचा शाल, पुष्पहार, फळांची झाडे, बहारदार वृक्ष, भेट देऊन नाविन्यपूर्ण पद्धतीने शुभेच्छा निरोप देण्यात आला. विजय चौधरी सर यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अध्यापनाचे कार्य प्रथम १९८७ धुळे येथून सुरुवात केली. 


जळगाव, पाचोरा, यावल येथे त्यांनी असंख्य कुशल तंत्र शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन, नेतृत्व ,उद्योजकता गुण निर्माण करून त्यांच्या करिअरच्या वाटा सुकर केल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण व नोकरीच्या संधी याबाबत निस्वार्थ भावनेतून बहुमोल मार्गदर्शन केले आहे. अनेक नामांकित कंपन्यांमध्ये त्यांचे विद्यार्थी मोठ्या पदावर विराजमान आहेत. स्वतःच्या कंपन्या देखील संभाळत आहेत याचा सार्थ अभिमान विजय चौधरी सरांना आहे. 


सेवा निवृत्ती निरोप समारंभ प्रसंगी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी - (D.V.E.O) एस. एम. पाटील,  प्राचार्य - टी. आर. पाटील,  शिल्पनिर्देशक - सौ एस. एन. फेगडे मॅडम, एस. एम. बढे, वाय. भाबड, वरिष्ठ लिपिक-  व्ही. व्ही.  महाजन, सहाय्यक भंडारपाल - पी. व्ही. न्याहाळदे, शिल्पनिर्देशक पी. एम. तांबट, बी. डी. फालक, ए. एस. येवले, बी. एम. देशमुख,  एन. टी. दालवाले, डी. एल. तडवी, कु.आर. व्ही. पाटील व विविध ट्रेड सर्व विद्यार्थी हजर होते. 



या  प्रसंगी - एस. एम. पाटील (डी. व्ही. ई.ओ. जळगाव) यांनी सांगितले की १९५० मध्ये शिल्पकार प्रशिक्षण योजनेअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची स्थापना करण्यात आली या मागचा प्रमुख हेतू म्हणजे वाढत्या औद्योगिक क्षेत्राची कुशल कर्मचाऱ्यांची गरज पूर्ण करणे हा होता विविध व्यावसायिक व्यवसायांमध्ये कौशल्य प्रदान करणे व विद्यार्थ्यांना रोजगाराच्या दिशेने वळवणे हे कार्य कौतुकास्पद आहे. 

प्राचार्य टी. आर. पाटील यांनी सांगितले की औद्योगिक प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणार्थींना पर्यावरण अनुभवाच्या वास्तविक कार्यासाठी आणि त्याचवेळी निरीक्षण आणि नोकरीच्या अंमलबजावणी द्वारे ज्ञान मिळवणे आहे. औद्योगिक प्रशिक्षणातून प्रशिक्षणार्थी कामाची नैतिकता संप्रेषण व्यवस्थापन आणि इतरातील कौशल्य देखील विकसित करतात.  


कार्यक्रम प्रसंगी परिवारातील सदस्य आप्तेष्ट उपस्थित होते. त्यांचे सामाजिक ग्रुप वर अभिनंदन केले जात आहे.





अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم