Khandesh Darpan 24x7

जात पडताळणी च्या जाळ्यात अडकलेले निंभोरा येथील सरपंच सचिन महाले अखेर बाहेर


 

निंभोरा प्रतिनिधी 


रावेर तालुक्यातील निंभोरा येथील सरपंच सचिन सुरेश महाले हे २०२१ निभोरा ग्रामपंचायत मध्ये एस. टी. च्या जागेवर वार्ड नं 1 मधून विजयी होऊन सरपंच पदावर विराजमान होऊन कार्यरत असतांना त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्यात आल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी अंमल मित्तल यांनी दि २ जुलै रोजी महाले यांना सरपंच पद अपात्रतेचा आदेश निंभोरा ग्रामपंचायत ग्रा. वि. स. अधीकारी गणेश पाटील यांना देण्यात आला.

लागलीच सरपंच महाले यांनी 10 जुलै रोजी शासनाचे एक वर्षाच्या मुदतवाढीचे मंजूर केलेले अध्यादेश दाखल करणेसाठी वाटचाल करण्या संदर्भात म. जिल्हाधिकारी मुख्यकार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी उप विभागीय अधिकारी तहसीलदार व ग्रामविकास अधिकारी ग्रा. प. गणेश पाटील निंभोरा यांना विनंती अर्ज करुन अल्प मुदत मागितली.


त्यानंतर शासन निर्णया च्या राज्यपालाच्या सहिनीशी च्या मुदत वाढी च्या प्रति जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होऊन नुकतेच ग्रा. वि. अधीकारी गणेश पाटील निंभोरा यांना पाठवण्यात आल्या त्यामुळे सरपंच सचिन महाले जात पडताळणीच्या जाळ्यातून बाहेर पडले आहे. 



त्याच्या बरोबर ह्या शासन निर्णयाचा जिल्यातील अपात्र झालेल्या एस. टी. जागेवरील सरपंचाना न्याय मिळणार आहे असे सरपंच महाले यांनी प्रस्तुत प्रतिनिधी ला सांगितले.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


 

Post a Comment

أحدث أقدم