Khandesh Darpan 24x7

प्राथमिक आरोग्य केंद्र वराडसिम : आरोग्य पर्यवेक्षक पदावरून रवींद्र चौधरी सेवानिवृत्त




प्रतिनिधी :  युवराज  चौधरी  |  राजेश चौधरी  


प्राथमिक आरोग्य केंद्र वराडसिम सच्चा सेवक रवींद्र गंगाधर चौधरी आरोग्य पर्यवेक्षक पदावरून प्रदिर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त 





ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांना आरोग्याच्या विविध सुविधा मोफत मिळाव्या यासाठी सरकारच्या वतीने ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. आरोग्य यंत्रणेमार्फत जनतेच्या कल्याणाच्या सेवा सुविधा देण्यात येतात. त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र वराडसिम येथील आरोग्य पर्यवेक्षक रवींद्र गंगाधर चौधरी मुळगाव थोरगव्हाण, ह. मू. भुसावळ हे नुकतेच 30 जून रोजी 28 वर्षे आपली सेवा इमाने ऐतबारे बजावून सेवानिवृत्त झाले. 


आरोग्य केंद्रात शासकीय निरोप समारंभ स्टाफ च्या वतीने संपन्न झाला. डॉक्टर तायडे, डॉक्टर भंगाळे, काळे दादा, माळी दादा यांच्यासह पूर्ण स्टाफ उपस्थित होता. त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात रावेर येथून आरोग्य सहाय्यक म्हणून सुरु केली. धामोडी, एनपुर, वराडसिम येथे इमारे इमाने एतबारे रुग्णांची सेवा केली. 



प्राथमिक आरोग्य केंद्र, वराडसिम येथे आरोग्य पर्यवेक्षक म्हणून त्यांनी कार्य केले. आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या पंचक्रोशीतील 16 गावांच्या प्रत्येक गरजू नागरिक माता, भगिनी, बालगोपाल, वृद्धांना ठराविक वेळेत लस देण्याची कठोर जबाबदारी सफल करून दाखवली. कोरोना कालखंडात भयावह स्थिती अशा वेळी प्रत्यक्षात जीव धोक्यात घालून गावकऱ्यांचे ध्येय मनोबल वाढवून मानवी जीवनाला सुरक्षित राखणारे धाडसी व्यक्तिमत्व म्हणजे कोरोना योद्धा रवींद्र चौधरी. 


याप्रसंगी समाजसेवक तथा माजी नगरसेवक युवराज लोणारी, सपकाळ बंधू,  कृषी भूषण पुरस्कार प्राप्त अनिल पाटील, विश्वनाथ चौधरी, प्रसाद चौधरी यांचे सह नातेवाईक आप्तेष्ट उपस्थित होते.






अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم