Khandesh Darpan 24x7

मोदी सरकारच्या ९ व्या वर्ष पूर्तीनिमित्त सावद्यात राबविले महा जनसंपर्क अभियान


 


प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 






भारतीय जनता पार्टी पक्षाच्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नुकतेच नऊ वर्ष पूर्ण झालीत. या नऊ वर्षात सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळवून दिला आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये मोदी सरकारने आणलेल्या विविध योजना, केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे उद्देशाने भारतीय जनता पार्टी संपूर्ण भारतात महा जनसंपर्क अभियान राबवित आहे. 



त्याचाच एक भाग म्हणून सावदा शहरात दिनांक ०६/०७/२०२३ रोजी  भाजपा तर्फे नागरिकांशी वैयक्तिक संपर्क साधून महा जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यात पहिल्या दिवशी गांधी चौक ते दुर्गा माता मंदिर या रस्त्यावरील सर्व व्यापारी वर्गाशी संपर्क करून मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळेस  मोदी सरकारच्या कामांप्रती समर्थन म्हणून ९०९०९०२०२४ या नंबर वर मिस्ड कॉल करण्याचे आवाहन करण्यात आले. 



याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष श्याम अकोले, शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, बेटी बचाव बेटी पढाव च्या जिल्हा संयोजिका सारिका चव्हाण, माजी नगरसेविका सौ रंजना भारंबे, सौ. नेहा गाजरे, माजी नगरसेवक भानुदास भारंबे, सागर चौधरी, नितीन खारे, चेतन नेमाडे, अतुल ओवे, अक्षय सरोदे, अमोल पासे, सचिन बऱ्हाटे, महेश भारंबे, अतुल नेमाडे, आकाश भोरटक्के, डॉ. अजितकुमार पाटील, दिपक लोमटे, बंडू भंगाळे  तसेच सरचिटणीस संतोष परदेशी व महेश अकोले उपस्थित होते.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم