Khandesh Darpan 24x7

"वृक्ष वल्ली आम्हा सोयरी" या तुकारामा च्या अभंगाचे महत्व निंभोरा येथील प्रल्हाद बोडे यांनी कार्यक्रमात सांगितले

 



निंभोरा प्रतिनिधी 


रावेर तालुक्यातील निंभोरा येथे नुकताच 2023 वन महोत्सव कृषितंत्र विद्यालयात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद बोडे यांनी झाडे जगवण्या करता व प्रत्येकाने एक तरी झाड लावावे या करता झाडाचे महत्व आपल्या मनोगतात तुकारामाच्या अभंगा चा उल्लेख करुन सांगितले.


यावेळी प्रमुख पाहुणे सरपंच सचिन महाले स. पो. नी. गणेश धुमाळ, राजीव बोरसे मान्यवराच्या हातून वृषारोपण करण्यात येऊन विद्यार्थी, विद्यार्थीनीना मार्गदर्शन करण्यात आले.

प्रास्तविक प्राचार्य एम. पी. भंगाळे यांनी केले, यावेळी डॉ. उल्हास पाटील कालेज चे विद्यार्थी राजेश पाटील, हर्षल भारबे, ललित बोडे, विशाल तायडे, विद्यालयाचे एस. एम. महाजन, जे. पी. भावसार, एस. आ.र बोंडे, व्ही. पी. बोंडे, डी. एस. बावस्कर, जे. एस. कोळंबे उपस्थित होते.


सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन व्ही. पी. बोडे यांनी केले.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


 

Post a Comment

أحدث أقدم