Khandesh Darpan 24x7

अट्रावल ते शेगाव पायी वारी सोबत एका श्वान सुद्धा ....


प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त अट्रावल ते शेगाव पायी वारी श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या दर्शनासाठी निघत असते. दर वर्षी प्रमाणे याही वर्षी 27 जून रोजी निघाली. पहिला मुक्काम सतपंथ मंदिर काहुरखेडा येथे येथे केला गेला तेथून निघाल्यानंतर बोहर्डी तालुका मुक्ताईनगर या गावांमधून एक (श्वान) कुत्री या पायी वारी सोबत मागे लागले आणि या वारीसोबत चालू लागले, पाहता पाहता ही श्वान कुठलाही त्रास न देता अगदी निमुटपणे चार मुक्काम करत शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी चालत गेली. ही वारी शेगावला पोहोचण्यासाठी पाच दिवस लागले मुक्काम करत करत एक तारखेला ही वारी शेगाव येथे दाखल झाली. काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई म्हणून तिला महाराजांनी बुद्धी दिली असावी म्हणून इतका प्रवास पायी चालत ती श्वान महाराजांच्या दर्शनासाठी गेली. यानंतर वारकऱ्यांनी तिला पुन्हा रिक्षेमध्ये तिच्या गावाला बोहार्डी (मुक्ताईनगर) येथे सुखरूप सोडले. या पंचक्रोशीत सर्वांना आश्चर्य वाटत आहे. 

वारिचे हे २१ वे वर्ष असून नंदकुमार जोशी, बबन जोशी, सुधीर कुलकर्णी, हेमंत जोशी, नाना ठाकरे, सोहन जोशी, राकेश सरोदे, नंदू काळे, वैभव जोशी, अविनाश जोशी, शिवम गुरव, गणेश सननसे हे वारीतील सदस्य आहेत.

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم