प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
संपूर्ण जगात भारताच्या चांद्रयान मोहिमेबद्दल उत्सुकता होती. तसेच ती यशस्वी होईल याबद्दल खात्री देखील होती. तशी ही मोहीम यशस्वी देखील झाली. 23 ऑगस्ट रोजी भारताचे चांद्रयान चंद्राच्या भूमीवर उतरले आणि फक्त भारतात च नव्हे तर सर्व जगभर जल्लोष करण्यात आला. त्याला कारणही तसेच होते. कारण यापूर्वीही चंद्राच्या भूमीवर अनेक देशांनी आपले यान यशस्वी रीतीने उतरविले आहेत पण भारताने जगात सर्वप्रथम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपल्या यानाचे सॉफ्ट लँडिंग करून अंतराळ विज्ञानात आपला ठसा उमटविला आहे.
या अद्भुत मोहिमेच्या यशाचे कौतुक जगभरात प्रत्येक भारतीय आपल्याकडून होईल तसे करण्याचा मनापासून प्रयत्न करीत आहे. भारताच्या या चांद्रयान मोहीम यशस्वी झाली म्हणून सावदा येथील श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील कन्या विद्यालयात सर्व इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थिनींना खिचडी सह शिरा वाटून आनंदाचा गोडवा वाढविण्यात आला. त्या बद्दल सर्व विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त केला.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव केंद्र शासन CCC कोर्स मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूट - कुळकर्णी सरांचे -
त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे, पर्यवेक्षक पी जी भालेराव,निर्मला बेंडाळे, मोहिनी राणे, सहकार्य केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
إرسال تعليق