Khandesh Darpan 24x7

इयत्ता 3 री तील कन्येची कामगिरी "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये




प्रतिनिधी :     राजेश चौधरी   |     प्रदीप कुळकर्णी  




सावदा  ता. रावेर  चे  रहिवासी  श्री मधुकर शिवराम कोष्टी (नारळे) यांची नात कुमारी रिशिता योगेश नारळे  वय वर्ष ८,  हचिंग्ज हायस्कूल, पुणे येथे इयत्ता 3 री मध्ये शिकत आहे. 




ब्टिट्ज अँथलेटिक्स, औंध (पुणे) मार्फत घेतल्या गेलेल्या 196 cm लांब उडी (उभे राहून लांब उडी मारून जास्तीत जास्त अंतर कापण्याचा विक्रम) - (MAXIMUM DISTANCE COVERED BY CHILD WHILE PERFORMING STANDING LONG JUMP) मध्ये कुमारी रिशिता ने घवघवीत यश मिळवत तिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2023 मध्ये नोंद झाली आहे. 


तिला या कामी प्रशिक्षक सौमित्र जोशी यांची साथ मिळाली. शाळेतील सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले असून पुढील वाटचाली साठी शुभेच्छ्या दिल्या. 

या कामगिरी बद्दल तिची सावदा परिसरात खूप कौतुक केले जात आहे. 


खांदेश दर्पण 24x7 च्या परिवारा तर्फे कुमारी रिशिता हिचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन तसेच शुभशिर्वाद...

सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 

एकमेव व्यावसायिक संगणक 

(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

Previous Post Next Post