Khandesh Darpan 24x7

निळे निशाण पदाधिकाऱ्या च्या फोन ने निंभोरा स्टेशन स्मशान भूमिचे प्रलंबित बांधकाम सुरु

 



निंभोरा प्रतिनिधी 


रावेर तालुक्यातील निंभोरा स्टेशन खिर्डी गेटवर शासनातर्फे उड्डाणं पूल तयार करण्यात आला त्यात पूल बनवण्या च्या मार्गात एका शेतातील स्टेशन परिसरातील स्मशान भूमी पाडण्यात आली होती.


नवीन स्मशान भूमिचे बांधकाम करुन देण्याचे बांधकाम विभागाने सांगितले असता ते बांधकाम सुरु होऊन, ते बांधकाम थांबले गेले, बरेच दिवस उलटून गेले तरी अपूर्ण पडून आहे. 


काही दिवसा पूर्वी अती जोराच्या पावसाने शेतातील नाल्या ला पाणी आल्याने स्मशान भूमी चे बांधकाम पाण्या खाली आले. नाल्याचे व पावसाचे पाणी ओसरल्यावरही बांधकाम विभागाने बांधकाम सुरु करण्यास दुर्लक्ष केले.



निंभोरा ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा वेळोवेळी सदर बाब बांधकाम विभागाकडे सदर बांधकाम सुरु करण्याची सूचना व मागणी केली असता संबंधित अधिकारी कानावर घेत नव्हते, पण निंभोरा येथील निळे निशाण संघटनेचे रावेर तालुका उपाध्यक्ष चद्रकांत सोनवणे यांना हा प्रकार समजताच त्यांनी बांधकाम विभागाचे तायडे साहेब यांना फोनवर आपल्या शैलीत संबंधित अधिकारी साहेबांना बांधकाम केव्हा चालू करणार? अशी विचारणा केली असता लागलीच स्मशान भूमिचे अपूर्ण राहिलेले बांधकाम सुरु करण्यात आले आहे, असे सोनवणे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.





अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


 

Post a Comment

أحدث أقدم