प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्या निमित्त सावदा शहरात नगरपालिकेच्या वतीने व श्री आ.गं. हायस्कूल व ना. गो. पाटील जुनियर कॉलेज सावदा त्याचप्रमाणे नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर सावदा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरांमध्ये विशाल अशा वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले.
या वृक्षदिंडीमध्ये श्री. आ.गं. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनी महाराष्ट्रीयन वेशभूषा व फेटे परिधान करून दिंडीच्या स्वरूपामध्ये रोपट्यांची पालखीमध्ये मिरवणूक काढून भव्य शोभायात्रा काढली.
एनसीसीचे विद्यार्थी व तिन्ही विद्यालयाची विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावदा श्री. आ. गं. हायस्कूल सावदा येथून वृक्षदिंडीची सुरुवात केली. त्यानंतर ही रॅली बस स्टॉप वरील बनाना सिटी या शिल्पाला वळसा घालून इंदिरा गांधी चौकात येऊन त्यानंतर सुगंगा नगर येथील ओपन स्पेस मध्ये ही वृक्षदिंडी वृक्ष घेऊन तिथपर्यंत पोहोचली.
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ वर क्लिक करा.
त्या ठिकाणी एनसीसीचे विद्यार्थी विद्यार्थिनी व सन्माननीय नगरसेवक यामध्ये राजेंद्र श्रीकांत चौधरी नगरसेविका नंदाताई लोखंडे, रंजना भारंबे, लीना चौधरी, मुख्याध्यापक सी. सी. सपकाळे, मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे, पर्यवेक्षक दे. वी. तायडे, पी. जी. भालेराव, कलाध्यापक नंदू पाटील सर, एनसीसी ऑफिसर एस. एम. महाजन सर, आर्यन जावळे सर, अनिल नेमाडे सर, ए.सी. राठोड सर, कल्पना शिरसाट, भारती महाजन, प्रणाली काटे, संध्या चौधरी, निलेश चौधरी सर, सचिन सकळकळे सर, निर्मला बेंडाळे, राधा राणी महाजन, आरती बढे
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ वर क्लिक करा.
त्याचप्रमाणे नगरपालिकेचे लेखापाल विशाल पाटील, लेखापरीक्षक भारती पाटील, बांधकाम विभागाचे अविनाश गवळे, हमीद तडवी, सतीश पाटील उपस्थित होते. या सर्वांनी एकत्रित येऊन अमृत वाटिका या नावाने त्या परिसरामध्ये फळांचे वृक्ष लावून एका नवीन प्रकल्पास सुरुवात केली व पर्यावरणास हातभार लावला.
إرسال تعليق