Khandesh Darpan 24x7

स्वातंत्र्यदिनानिमित्त सावदा नगरपरिषद तर्फे स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मानपत्र, बुके व शाल देऊन सत्कार (मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीमध्ये ध्वजवंदनाचा सोहळा संपन्न)



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 








दि १५ ऑगस्ट 2023 या दिवशी स्वातंत्र्यदिनानिमित्त नगरपरिषद सावदा येथे झेंडावंदनासाठी शहरातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, सावद्यातील प्रतिष्ठित, सन्माननीय नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, आजी-माजी सैनिक व शहरातील इतर प्रतिष्ठित सर्व शाळांचे  कर्मचारी वृंद व विद्यार्थी, एनसीसीचा ग्रुप, होमगार्डचा ग्रुप, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






या प्रसंगी नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी ध्वजवंदन करून ध्वज फडकावून ध्वजास सलामी दिली. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व झेंडा गीत सादर केले . 




यानंतर स्वातंत्र्य सैनिकांच्या शिलालेखास माल्याअर्पण करण्यात आले. तदनंतर "मेरी मिट्टी मेरा देश" या अंतर्गत प्रशासनाने ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन अमूल्य असे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिले त्याप्रित्यर्थ आपण सर्व भारतीय त्यांच्या ॠणामध्ये आहोत. त्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही. परंतु स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदाना प्रित्यर्थ त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांना सन्मान देण्यासाठी त्यांचा सत्कार व जे स्वातंत्र्यसैनिक आज हयात नाही त्यांच्या वारसदारांचा सत्कार व सीमेवर आपल्या देशाचे संरक्षण करणारे सर्व भारतीय सेनेचे आजी-माजी सैनिक या सर्वांचा याप्रसंगी सन्मानपत्र, बुके व शाल देऊन सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.







सदर प्रसंगी उपस्थित भावुक झाले होते. या प्रसंगी स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणीत उजाळा देण्यात आला व या प्रसंगी उपस्थित सर्व भारतीय सेनेचे फौजी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला .


या सोहळ्यातून विद्यार्थ्यांना अतिशय मौलिक संदेश दिला गेला आपण ज्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कुणीतरी आपले बलिदान दिलेले आहे ही भावना विद्यार्थ्यांना फार मोठा संदेश देऊन गेली.




अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

Previous Post Next Post