प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा नगरपालिकेची स्थापना ब्रिटिश राजवटीत १ ऑगस्ट १८४३ साली बॉम्बे मुन्सिपल ऍक्ट अंतर्गत अध्यादेश काढून पालिका स्थापन केली. हि राज्यातील आणि जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगर पालिका आहे.
पालिकेने १९१९ मध्ये पालिकेला प्रथमच आपला नगराध्यक्ष निवडण्याचा अधिकार मिळाला व त्यावेळी सरदार गंगाधरराव रघुनाथराव देशमुख हे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले होते. पालिका इतिहासात सर्वाधिक काळ अर्थात ३८ वर्षे नगराध्यक्ष रावसाहेब विष्णू हरी पाटील यांनी तर १० वर्षे त्यांचे सुपुत्र रवींद्र पाटील यांनी नगराध्यक्षपद सांभाळले होते. पालिकेच्या १४० वर्षाच्या इतिहासात आतापर्यंत १४ नगराध्यक्ष होऊन गेलेत.
अशा या पालिकेला मंगळवार, १ ऑगस्ट रोजी १४० वर्ष पूर्ण झाल्याने पालिका कर्मचारी यांनी केक कापून पालिकेचा स्थापनादिन हा दिवस उत्साहात साजरा केला. यावेळी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारा समोर केक कापून हा दिवस साजरा केला गेला.
यावेळी लेखापरीक्षक भारती पाटील यांचे हातून केक कापला गेला तसेच कार्यालय अधीक्षक सचिन चोळके, लेखापाल विशाल पाटील, पाणीपुरवठा अभियंता जितेश पाटील, आरोग्य विभाग कर्मचारी अरुणा चौधरी, आकाश तायडे, सामान्य प्रशासन विभागाचे संजय माळी, सतीश पाटील, विमलेश जैन, हमीद तडवी, अरुण ठोसरे, बबन तडवी, राजू साळी, राजू मोरे, संदीप वाणी, विजू चौधरी, चंद्रकांत धांडे, धीरज बनसोडे यांच्यासह कर्मचारी पत्रकार दिपक श्रावगे उपस्थित होते.
Post a Comment