Khandesh Darpan 24x7

एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, जेणे करून आपल्या मातीचे, वसुंधरेचे संगोपन केले जाईल -- मुख्याधिकारी किशोर चव्हाण




प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


"मेरी मिट्टी मेरा देश" या मोहिम अंतर्गत सावदा येथील श्री. नानासाहेब विष्णू हरी पाटील कन्या विद्यालयात देश भक्ती पर गायन स्पर्धा घेण्यात आल्या. गेल्या वर्षभरात संपूर्ण भारतात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला गेला त्याच्या समारोपात मेरी मिट्टी मेरा देश हा समारोपाचा कार्यक्रम संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत आहे. 


त्या अंतर्गत मशाल रॅली, वृक्ष दिंडी, या सारखे कार्यक्रम सावदा येथील एस. एन. वी. एच. पी. विद्यालय आणि आ. गं. हायस्कूल च्या सहकार्याने राबविले जात आहेत. त्या अंतर्गत कन्या विद्यालयात देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा पार पडल्या. यात विद्यालयातील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. 


तसेच यावेळी शासनातर्फे देण्यात येणारे मोफत शालेय गणवेश देखील सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी चव्हाण यांनी विद्यालयातील विद्यार्थिनी तसेच त्यांच्या पालकांना सर्वांनी मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, जेणे करून आपल्या मातीचे, वसुंधरेचे संगोपन केले जाईल. असे आवाहन केले. 


या वेळी शाळेचे पर्यवेक्षक पी. जी. भालेराव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा रुपाली जैन, व्यवस्थापन समितीच्या सदस्या काठोरे , मनीषा पाटील तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक पी. जी. भालेराव, आदी उपस्थित होते. 



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निर्मला बेंडाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जी. बी. तडवी, आर. एन. जावळे, चारुलता चौधरी, आर. पी. टोके, मोहिनी राणे, स्वप्नील वंजारी, निलेश चौधरी, विनोद महेश्री, कल्पना देवकर, सुभेदार तडवी, सुलभा मेढे, सचिन सकळकळे यांनी परिश्रम घेतले.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم