Khandesh Darpan 24x7

सावदा येथे निवासी नायब तहसीलदार यांचे कार्यालय सुरु करावे - आ. चंद्रकांत पाटील यांना निवेदन

 



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


रावेर तहसील कार्यालयात दाखल्यांचा अन्य बाबींसाठी विलंब होत असल्याने सावदा येथे निवासी नायब तहसीलदारांचे कार्यालय सुरू करावे अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख सुरज परदेशी यांनी आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.


सविस्तर वृत्त असे कि, सावदा तसेच परिसरातील सुमारे ४० गावांमधील अबालवृद्धांना दाखले तसेच अन्य शासकीय अत्यावश्यक कामांसाठी रावेर तहसील कार्यालयात जावे लागते, येथे कामांना विलंब लागत असल्याने एकाच कामासाठी अनेकदा जावे लागते. यामुळे लोकांची पायपीट होतानाच त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. 


सावदा हे परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असून याला सुमारे 40 खेडी जोडलेली आहे. येथे नायब तहसील कार्यालय केल्यास परिसरातील नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले मिळण्यासाठी रावेर येथे जावे लागणार नाही. परिणामी लोकांची पायपीट सुद्धा वाचेल यामुळे सावदा येथे निवासी नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख सुरज परदेशी यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. 


निवेदन प्रसंगी उपस्थित माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशी, माजी नगरसेवक फिरोज खान, संजय गांधी समितीचे सदस्य फिरोज लेफ्टी,  माजी नगरसेवक संजय चौधरी, युवा उद्योजक रितेश पाटील, गजू लोखंडे, युवा सेना शहर प्रमुख मनीष भंगाळे, चेतन नेमाडे, गणेश माळी, अजय कासार, संतोष कासार, राकेश कासार, प्रदीप कासार, भूषण कासार, प्रशांत कासार, अनिल कासार, आदी उपस्थित होते.


सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 

एकमेव व्यावसायिक संगणक 

(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم