फैजपूर प्रतिनिधी
अल्पसंख्याक सुरक्षा व तिरंगा परिषदेचे आयोजन तसेच अल्पसंख्याक आक्रोश तिरंगा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयवर धड़कनार - जगन सोनवणे
दिनांक २ ऑगस्ट २०२३ रोजी फैजपुर येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा कमिटीच्या वतीने पत्रकार परिषदेचे फैजपुर नगरपालिकेच्या हॉल मध्ये आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पी.आर.पी. प्रदेश उपाध्यक्ष व जळगाव जिल्हा अध्यक्ष जगन भाऊ सोनवणे भावी आमदार भुसावळ पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले की, दिनांक 31 जुलै 2023 या रोजी जयपुर मुंबई सुपरफास्ट ट्रेनमध्ये एका माथेफिरू आर.पी.एफ. जवान चेतन सिंग ने बेधुंद गोळीबार करून हिंदू आर.पी.एफ. इन्स्पेक्टर मीना साहेब व तीन निरपराध मुस्लिम यात्रेकरू यांची गोळ्या घालून क्रूरपणे हत्या केली.
हत्या केल्यानंतर हा हत्यारा माथे फिरू म्हणाला की, "अगर हिंदुस्तान मे रहना होगा तो मोदी और योगी ठाकरे को मतदान करना होगा." तेंव्हा या माथेफिरूला चार निरपराध हिंदू - मुस्लिम बांधवांच्या खून प्रकरणी फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तसेच पुढे बोलताना कामगार नेते जगन सोनवणे म्हणाले की, विदेशात मोदी प्रधानमंत्री म्हणतात, भारतातील अल्पसंख्यांक सुरक्षित आहेत मात्र भारतामध्ये तशी परिस्थिती नाही.
आणि म्हणून अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी व हिंदू - मुस्लिम एकता अभियानांतर्गत खालील तीन आंदोलने- आंदोलन पुरुष जगन सोनवणे यांनी जाहीर केले ते पुढील प्रमाणे...
फैजपूर
दिनांक ९ ऑगस्ट २०२३ या क्रांतीदिनी दिवशी - भारतीयांनी नारा दिला होता की, "ब्रिटिश भारत छोडो" यापासून प्रेरणा घेऊन "मनुवादी भारत छोडो" या शीर्षकाखाली फैजपूर येथे सायंकाळी सहा वाजता नगरपालिका सभागृह मध्ये अल्पसंख्यांक सुरक्षा व आक्रोश तिरंगा परिषद होईल तसेच
भुसावळ
दिनांक १५ ऑगस्ट २०२३ या दिवशी - भुसावळ येथील रजा टावर जवळील हॉलमध्ये सायंकाळी सहा वाजता स्वातंत्र्यदिनानिमित्त अल्पसंख्यांक सुरक्षा आक्रोश परिषद होईल देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदू - मुस्लिम यांनी रक्त सांडविले आहे, तिरंग्यासाठी देशातील हिंदू - मुस्लिम यांनी जीवा ची आहुती दिली आहे.
जळगाव
तसेच दिनांक २१ ऑगस्ट २०२३ या दिवशी - जळगाव येथे दुपारी दोन वाजता संविधान निर्माते परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, रेल्वे स्टेशन येथून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अल्पसंख्यांक आक्रोश तिरंगा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
तरी तमाम हिंदू - मुस्लिम संघटनांनी, संविधान वादी संघटनांनी, रिपब्लिकन बहुजनवादी संघटनांनी या मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टी व विविध १० संघटनांच्या वतीने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यानी केले असून यांच्या नेतृत्वात सदरील आंदोलने होणार आहेत.
फैजपूर येथील पत्रकार परिषदेला पी. आर. पी. प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष जगन भाऊ सोनवणे तसेच पी.आर.पी. जळगाव जिल्हा अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष आरिफ भाई शेख, पी.आर.पी. युवा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व संविधान आर्मी प्रदेश अध्यक्ष राकेश भाई बगन, तसेच पी.आर.पी. ओ.बी.सी. सेल जिल्हाध्यक्ष गोपी भाऊ साळी, राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हा अध्यक्ष हरीश भाई सुरवाडे, पी.आर.पी. भुसावळ तालुका अध्यक्ष संघपाल भाऊ कीर्तीकर, पी. आर. पी. अल्पसंख्यांक फैजपूर शहराध्यक्ष बब्बू शहा, तसेच गणेश परदेशी इत्यादी उपस्थित होते.
إرسال تعليق