Khandesh Darpan 24x7

हिंगोणा येथे नियोजित कै. हरिभाऊ जावळे केळी महामंडळाची स्थापना करावी - जिल्हाधिकारी यांना निवेदन


 

प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचा सावदा येथे दौरा होता त्यादरम्यान कै. हरिभाऊ जावळे केळी महामंडळाची स्थापना कृषिमित्र कै. हरिभाऊ जावळे यांच्याच कर्मभूमीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जागेत हिंगोणा ता. रावेर, येथेच करावी असे निवेदन माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.


निवेदनात म्हटले आहे की, हिंगोणा ता. यावल येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत टिशू कल्चर प्रयोगशाळा प्रकल्प स्थापन करण्यासाठी ग्रामपंचायतीने त्यांची 70 एकर उपजाऊ जमीन विद्यापीठास हस्तांतरीत केलेली आहे.  मात्र विद्यापीठाने हा प्रकल्प रद्द केल्याने ही जमीन पडून आहे. 


जळगाव जिल्ह्यातील जवळपास 75% - 35,000 हेक्टर केळीचे क्षेत्र हे एकट्या रावेर, यावल तालुक्यात असल्याने याच तालुक्यांत केळीवर संशोधन व सुविधा प्रकल्प स्थापन झाल्यास त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. 


सद्यस्थितीत जळगाव येथे म. फुले कृषी विद्यापीठांतर्गत केळी संशोधन केंद्र कार्यरत असून त्याचा जास्त अंतरामुळे पाहिजे तसा फायदा रावेर- यावल तालुक्यातील शेतकऱ्यांना घेता येत नाही.


प्रस्तावित "हरिभाऊ जावळे केळी महामंडळ" हिंगोणा, ता. यावल येथे स्थापन झाल्यास जिल्ह्यातील जास्तीत जास्त म्हणजे रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर या प्रमुख उत्पादक तालुक्यातील शेतकऱ्यांना येथील संशोधन व सुविधांचा लाभ होईल. तसेच येथील स्थानिक वातावरणात संशोधन झाल्यास त्याचा प्रत्यक्ष उपयोग शेतकऱ्यांना होईल.


सूचना - काही तांत्रिक अडचणींमुळे खान्देश दर्पण 24x7 चे पोर्टल अपडेट करण्याचे काम सुरू असल्या कारणामुळे ही बातम्या उशिरा म्हणजे आज प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे खान्देश दर्पण 24x7 परिवार दिलगिरी व्यक्त करीत आहोत.*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

संपादक - राजेश चौधरी (राज सर),  उपसंपादक - प्रदीप कुलकर्णी (सर), संपूर्ण खान्देश दर्पण 24x7 परिवार


सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 

एकमेव व्यावसायिक संगणक 

(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم