Khandesh Darpan 24x7

दसनुर येथे महादेव कावड यात्रा



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


सावदा येथून जवळच असलेले दसनुर येथे प्राचीन स्वयंभू शिव मंदिर आहे. सुकी नदी तीरावर असलेले शिव मंदिर हे सुमारे ८०० वर्षा पूर्वीचे आहे. अधिक मास समाप्ती व श्रावण प्रारंभ या शुभ दिनी कावड यात्रा हा भव्य कार्यक्रम आयोजीला आहे. 


कावड यात्रेत समस्थ ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक माता, भगिनी सहभाग घेणार असून माता तापी व पूर्णा नदीचे पाणी कावड मध्ये आणून शिवाभिषेक होणार आहे.


कावड यात्रा ही दि. 16/08/2023 रोजी निघणार आहे. 12 किलोमीटर अंतर पायी चालून भजनाचा साथ असणार आहे या कावड यात्रेत सर्व भाविकांनी सहभागी होऊन शिवभक्ती रस घ्या. असे समस्त आयोजक ग्रामस्थ दसनुर यांनी केले आहे.


स्वयंभू शिव मंदिर (स्वयंभू पिंड) इतिहास 



उमेश्वर महादेव मंदिराची अख्यायिका


रावेर तालुक्यातील दसनूर येथे सुकी नदी काठावर प्राचीन महादेवाचे उमेश्वर महादेव मंदिर आहे. सुमारे ८०० वर्षापुर्वीचे हे मंदिर येथे आहे. एका भक्ताला साक्षात्कार झाल्याचे समजले व ती जागा साफ करीत असतांना पिंडाला फावडे लागले व त्यातून पाणी व रक्ताच्या धारा निघाल्या होत्या तसेच हि पिंड येथुन खोदुन गावात स्थापित करण्यासाठी आणण्याचा प्रयत्न केला. पिंड खोदली असता जमिनीखालचे पाणी लागले पण पिंडीचा अंत लागला नाही. 



हि पिंड जमिनीतून निघाली आहे अशी येथील भाविकांची श्रध्दा आहे तसेच हि पिंड जमिनीत थोड्या अंतराने अष्टपैलू आहे म्हणून हे प्राचिन मंदिर अष्टपैलू बांधलेले आहे. तसेच पुर्वी हे बांधकाम मातीचे व दगडाचे होते आज त्याला बाह्यरूप नविन दिले आहे तसेच २०० वर्षापासुन सकाळ, संध्याकाळ या वेळेस पुजापाठ व महादेवाची नित्यनियमाने आरती व पुजापाठ होत असते.


तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी फराळ प्रसाद वाटपाचा व तिसऱ्या सोमवार भजन गायन कार्यक्रम हे नित्यनियमाने सुरू आहे. श्रावण महिन्यात पोळ्याच्या पाडव्याला महादेवाची यात्रा भरते व हजारोच्या संख्येने भाविक येतात. तसेच आता हे मंदिराचे सर्व कामकाज ट्रस्टच्या देखरेखीत केले जात आहे व शासनाने याला तिर्थक्षेत्र घोषित केले आहे.


महाशिवरात्रीला महादेवाच्या मुकूटाची मोठी दिंडी गावातून फिरत असते व भाविक त्या आनंदाच्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात, कार्तिक महिन्यात पहाटे कार्तिक स्नान, गावातून काकडा आरती व दिंडी फिरत असते.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

Previous Post Next Post