प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
खोटे व बनावट दस्तावेज तयार करून केलेल्या फसवणूकीबाबत आरोपी विनोद सुधाकर चौधरी मांगलवाडी (ह.मु. सावदा) यास पोलिसांनी मंगळवारी दि. 8 रोजी अटक केली. त्यास बुधवारी रावेर न्यायालयात हजर केल्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आली.
मधुकर चौधरी (वय ७२) यांचे वडीलांचे नावाने मांगलवाडी ता.रावेर शेत गट नं ८९/१ ही शेतजमीन होती. या शेतजमीनीपैकी काही क्षेत्र हतनूर प्रकल्पासाठी संपादीत करण्यात आले असून काही क्षेत्र शिल्लक आहे.
फिर्यादी चौधरी यांचे मयत वडीलांच्या मालकीचे नमूद मिळकतीपैकी संपादना व्यतिरिक्त शिल्लक असलेली शेतजमीन आरोपीने मयताचे वारसाची संमती न घेता संमतीपत्रावर फिर्यादी यांची खोटी स्वाक्षरी व त्यांचे मोठे भाऊ गोविंदा चौधरी यांचा खोटा अंगठा करून वारसही कमी दाखवून पाटबंधारे विभागाकडे सादर करून सदरची मिळकत भाडेकराराने कसण्यास घेतली.
फिर्यादीला माहीती अधिकारातून माहीती घेतली असता सदर बाब उघडकीस आली. याबाबत न्यायालयाच्या आदेशाने सावदा पोलिसात गुन्हा दाखल होऊन आरोपीस अटक झाली होती.
Post a Comment