प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
दिनांक १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे विभाजन होऊन दिनांक १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. मात्र ज्या फाळणीच्या आधारावर देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या फाळणीच्या वेळी खोलवर झालेल्या जखमा आजही तमाम भारतीयांच्या मनावर चिरंतर आहेत.
याच फाळणीच्या काळ्याकुट्ट वास्तवाची ओळख सर्वांना व्हावी या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून *विभाजन विभीषिका स्मरण दिन प्रदर्शनी* भाजपा सावदा तर्फे आयोजित करण्यात आलेली आहे. या प्रदर्शनी मध्ये स्वातंत्र्यापूर्वीपासून ते फाळणी होऊन देश स्वतंत्र होण्यापर्यंत घडलेल्या घटना, भारतीयांवर झालेल्या अत्याचाराचे वास्तवदर्शी चित्रण प्रदर्शित करण्यात आलेले आहे.
या प्रदर्शनीचे उद्घाटन दिनांक १४ ऑगस्ट २०२३ वार सोमवार या दिवशी सकाळी दहा वाजता सेवानिवृत्त सैनिक मनोहर बढे, संतोष चौधरी व भाजपा जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी चित्र प्रदर्शनीला भेट देऊन फाळणीच्या वेळेस घडलेल्या घटनाबाबत माहिती घेतली. प्रसंगी रावेर लोकसभा प्रमुख नंदकिशोर महाजन, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, शिवाजीराव पाटील, हरलाल कोळी, रावेर तालुका अध्यक्ष राजन लासुरकर, तालुका सरचिटणीस महेश चौधरी, राष्ट्रीय परिषद सदस्य डॉ. अतुल सरोदे, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,
माजी नगराध्यक्षा सौ. देवायानी बेंडाळे, माजी नगरसेविका सौ. लीना चौधरी, सौ. नंदाबाई लोखंडे, बेटी बचाव बेटी पढाव च्या जिल्हा संयोजिका सौ. सारिका चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष श्याम अकोले, भाउलाल चौधरी, युवासेना प्रमुख (शिंदे गट) मनीष भंगाळे, शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, राजेश भंगाळे, नितीन खारे, सचिन बऱ्हाटे, विकी भिडे, विजय पाचपांडे, चेतन नेमाडे, सागर चौधरी, महेश बेदरकर, जितेंद्र गाजरे, पंकज परदेशी, किरण महेश्री, राजकिरण बेंडाले, संजय चौधरी, अतुल चौधरी यासह सरचिटणीस संतोष परदेशी व महेश अकोले उपस्थित होते. प्रदर्शन दिवसभर असणार असून नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन भाजपा तर्फे करण्यात आले.
Post a Comment