Khandesh Darpan 24x7

भारतीय डाक घराचे सातपुडा पर्वत रांगांमधील दुर्गम भागात उद्घाटन


प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 



भारतीय डाक विभागातर्फे, भुसावळ विभाग भुसावळ, ४२५२०१ मधील सहाय्यक अधीक्षक  उपविभाग भुसावळ अंतर्गत आज दि. ०3/०८/२०२३ रोजी सातपुडा पर्वत रांगांमधील दुर्गम भागात वसलेल्या सहस्रलिंग या गावात मा. अधीक्षक डाकघर भुसावळ विभाग भुसावळ कुंदन जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मा. सहाय्यक अधीक्षक भुसावळ उपविभाग अनुप गणोरे साहेब यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली सहस्त्रलिंग या नवीन शाखा डाकघराचे सरपंच अरमान तडवी यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. 



सदर प्रसंगी गावाचे सरपंच अरमान तडवी, उपसरपंच करीम तडवी, ग्रामसेवक राजेन्द्र तडवी, तसेच शाखा डाकघरा साठी जागा उपलब्ध करुन देणारे छबु तडवी व समस्त गावकरी उपस्थित होते. सदर प्रसंगी मा. अधीक्षक डाकघर कुंदन जाधव साहेब यांनी पोस्ट खात्याच्या अनेकविध योजना विषयी मार्गदर्शन केले व जगातील सर्वात विश्वसनीय अशा भारतीय डाक विभागाच्या डाकघरात आपली गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. 


सदर प्रसंगी डाक अधिदर्शक  विनोद कासार यांनी दुर्गम भागात सुद्धा कशा पद्धतीने भारतीय डाक विभाग सेवा देण्यात तत्पर व समर्थ आहे याविषयी बोलून शाखा डाक घराच्या कार्याविषयी गावकऱ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावचे मुख्याध्यापक सपकाळे गुरुजी यांनी केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी भुसावळ विभागीय पदाधिकारी कनकसिंग नरुका, कर्मचारी हेमंत कुरकुरे, किरण चौधरी,  उपस्थित होते. शिवाजी पवार  यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार करण्यासाठी मेहनत घेतली.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم